PHOTO | पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच काळ्या रंगात का लिहिली जातात रेल्वे स्थानकांची नावे? जाणून घ्या यामागची कारणे
पिवळा रंग इतरांपेक्षा अधिक चमकदार असतो, जो दूरवरून दिसू शकतो. रेल्वे स्थानकांवर थांबणार्या गाड्या नेहमी नामांकित बोर्डजवळच थांबतात आणि पिवळा रंग थांबण्याचे संकेत दर्शवितो. (Know why the names of railway stations are written in black on the yellow board)
आपण कधी ट्रेनने प्रवास केला असेल किंवा नसेलही, मात्र आपण रेल्वे स्टेशनवर कधीतरी गेलाच असाल. तेथे तुमच्या लक्षात आले असेल की रेल्वे स्थानकाचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या रंगाने लिहिलेले असेल. वास्तविक, देशातील सर्व रेल्वे स्थानकांची नावे केवळ काळ्या रंगाने पिवळ्या बोर्डवर लिहिली जातात.
Follow us

आपण बर्याचदा भारतीय गाड्यांमध्ये प्रवास करत असाल तर आपण विचार केला आहे का रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवर काळ्या रंगाने का लिहिली जातात? वास्तविक, त्यामागे एक नाही, तर अनेक विशेष कारणे आहेत.
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची मान्यता
पिवळ्या रंगाचा फलक रेल्वेच्या लोको पायलटला गती कमी करण्याचा किंवा सावधगिरीचा संकेत देतो. अनेक रेल्वे स्थानकांवर गाड्या थांबत नाहीत, अशा गाड्यांचे लोको पायलट स्टेशनमध्ये प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत सतर्क असतात आणि सतत हॉर्न वाजवतात जेणेकरून स्टेशनवर उपस्थित प्रवासी सावध होतील.
रात्रीच्या अंधारात इतर रंगांच्या तुलनेत पिवळा रंग बराच प्रभावी आहे. याशिवाय या रंगामुळे डोळ्यांनाही मोठा आराम मिळतो. पिवळ्या बोर्डवर काळ्या रंगात लिहिलेले स्टेशनचे नाव दूरवरून पाहिले जाऊ शकते.