हिटलरच नव्हे तर या हुकूमशहाने देखील केला होता भयंकर नरसंहार, लाखो लोकांना केले होते ठार
जर्मन हकुमशहा हिटलर आपल्याला क्रुरकर्मा म्हणून चिरपरिचित असला तरी त्याच्या पेक्षाही जगातील एका हुकूमशहाने सर्वाधिक लोकांना यमसदनी धाडले होते. कोण आहे का हुकूमशहा पाहूयात...
जगात जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याला सर्वात क्रुर आणि मानवी नरसंहार करणारा नेता म्हटले जाते. परंतू हिटलर शिवाय आणखी एक हुकूमशहा देखील नरसंहारात कमी नव्हता. या नेत्याने आपल्या देखील जनतेचा नरसंहार केला. आज आपण या क्रुरकर्मा नेता आणि हुकूमशहा स्टॅलिन याच्या बाबतील माहिती घेणार आहोत. कोण होते स्टॅलिन याने त्याच्या कारकीर्दीत देखील जनतेचा कसा छळ केला ते पाहूयात…
कोण होता जोसेफ स्टॅलिन
जोसेफ स्टालिन 1929 ते 1953 या काळात सोव्हीएत सोशलिस्ट रिपब्लिक संघाचे ( युएसएसआर ) हुकूमशहा होते. स्टॅलिन 1941 ते 1953 सोव्हीएत संघाचे पंतप्रधान होते. स्टॅलिन याच्या कारकिर्दीत सोव्हीएत संघाचे एक कृषी आधारित अर्थव्यवस्थेचे एक औद्योगिक केंद्र आणि लष्करी महाशक्तीत परिवर्तन झाले. परंतू जोसेफ स्टॅलिन याचे सरकार जनतेचे हाल करणारे होते.स्टॅलिन क्रुरकर्मा होता. त्याच्या कारकीर्दीत लाखो सोव्हीएत नागरिकांच्या हत्या झाल्या.
केव्हा जन्म झाला
जोसेफ स्टॅलिन याचा जन्म 6 डिसेंबर 1878 मध्ये जॉर्जिया येथील गोरी नावाच्या गावात झाला. स्टॅलिन याचे लहानपणीचे नाव जोसेफ विसारियोनोविच जुगाशविली होते.जेव्हा स्टॅलिन याचा जन्म झाला तेव्हा जॉर्जिया रशियाचे राजे झार यांच्या साम्राज्याचा भाग होता. बेसारियन युगाशविली आणि एकातेरिन गेलाद्जे या आई-वडीलांच्या पोटी तो जन्मला होता. जोसेफ स्टॅलिन याची अनेक भावंडे जन्मताच मरण पावली होती. परंतू जगलेला एकमेव मुलगा होता. बेसारियन एका चर्मकाराच्या दुकानात काम करीत होता. तर त्याची आई दुसऱ्यांच्या घरी कपडे धुण्याचे काम करायची..
चर्चेमध्ये शिक्षण घेतले
1888 ते 1894 पर्यंत स्टॅलिनने गोरी येथील एका चर्च स्कूममध्ये शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर स्टॅलिनने फादर बनण्याचे शिक्षण घेण्यासाठी तिफ्लिस थियोलॉजिकल सेमिनरीत प्रवेश घेतला. त्यानंतर त्याला कळले की आपल्याला धार्मिक पुस्तकात अजिबात रस नाही. त्यानंतर कार्ल मार्क्सची पुस्तके वाचू लागला. स्टॅलिन 19 व्या वर्षीच तो मार्क्सच्या सिद्धांतावर काम करणाऱ्या गुप्त संस्थेचा सदस्य बनला.
साल 1924 मध्ये स्टॅलिन याचा मृत्यू झाला.त्यानंतर जोसेफ स्टॅलिन याने स्वत:ला लेनिनचे वारसदार म्हणून जाहीर केले. परंतू पक्षाचे अनेक नेते लेनिन नंतर लियोन ट्राटस्की यांना वारसदार मानत होते. त्यानंतर जोसेफ स्टालिन याने आपल्या विचारांचा खूप प्रसार केला. आपल्या जगात क्रांती करायची नसून केवळ सोव्हीएत संघाला सर्वोच्च स्थानी न्यायचे आहे असे तो म्हणायचा. जेव्हा ट्रॉटस्की याने स्टॅलिनच्या योजनांना विरोध केला तेव्हा स्टॅलिनने त्याला देशातून हाकलून लावले. 1920 जोसेफ स्टॅलिन सोव्हीएत रशियन संघाचा सर्वोच्च नेता झाला होता.
लाखोंचा नरसंहार केला
जोसेफ स्टॅलिन याने स्वत:चा मृदू स्वभावाचा आणि देशभक्त नेता असा प्रचार करीत असायचा. परंतू जे लोक त्याला विरोध करायचे त्यांना स्टॅलिन संपवून टाकायचा. यात सैन्यातील मोठे अधिकारी, कम्युनिस्ट पार्टीचे लोक देखील सामील होते. स्टॅलिनने पक्षातील सेंट्रल कमिटीच्या 139 पैकी 93 लोकांची हत्या केली होती. तसेच त्याने लष्करातील 103 जनरल आणि एडमिरलपैकी 81 जणांची हत्या केली होती. तसेच त्याचे गुप्त पोलिस दल सक्तीने त्याचे धोरण लागू करायचे.यावेळी साम्यवादाचा विरोध करणाऱ्या तील लाख लोकांना सायबेरियातील गुलाग येते राहाण्यासाठी जबरदस्तीने पाठविले होते. तसेच सुमारे साडे सात लोकांची हत्या त्याने केल्या होत्या.