गहू आणि तांदूळ विनामूल्य मिळण्यासाठी बनवा हे कागदपत्र, सरकारने दिली संपूर्ण माहिती
या मोहिमेमध्ये लोकांचे रेशन कार्ड तयार केले जाईल आणि आपल्याकडे रेशनकार्ड नसेल तर ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला रेशनकार्ड मिळू शकेल. (Make this document to get wheat and rice for free, complete information given by the government)
नवी दिल्ली : प्राथमिकतेच्या आधारे केंद्र सरकारने समाजातील अत्यंत असुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना रेशन कार्ड देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वास्तविक, केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचे रेशनकार्ड बनवून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात (एनएफएसए) समाविष्ट करण्यास सांगितले आहे. यानंतर सर्व राज्यात शिधापत्रिका बनविण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात येणार आहे. (Make this document to get wheat and rice for free, complete information given by the government)
कोरोना काळात एनएसए अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची ओळख करून त्यांना या कायद्याच्या कक्षेत आणणे आवश्यक झाले आहे. अद्याप बरेच लोक विनामूल्य रेशनचा लाभ घेत नाहीत. या मोहिमेमध्ये लोकांचे रेशन कार्ड तयार केले जाईल आणि आपल्याकडे रेशनकार्ड नसेल तर ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला रेशनकार्ड मिळू शकेल.
काय आहे नवा उपक्रम?
एनएफएसए अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 1.97 कोटी लोकांना जोडण्याची संधी आहे. त्याअंतर्गत एकूण 14 राज्यांनी त्यांचा 100 टक्के कोटा पूर्ण केला आहे. ज्या लोकांचे रेशनकार्ड बनविण्याचा उपक्रम सुरु आहे, अशा लोकांमध्ये बेघर लोक, कचरा वेचणारे, फेरीवाले, रिक्षा चालक आणि अन्य लोकांचा समावेश आहे. एनएफएसए अंतर्गत पात्र व्यक्ती / घरांची ओळखपत्र आणि शिधापत्रिका प्रदान करणे ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी आहे.
कसे बनवायचे आपले रेशन कार्ड?
जर आपल्याजवळ रेशन कार्ड नसेल पण आपणही ऑनलाईन बनवू शकता. रेशन कार्ड ऑनलाईन बनविण्यासाठी प्रत्येक राज्याने एक खास वेबसाईट बनविली आहे. आपण ज्या राज्याचे नागरीक आहात, त्या राज्याच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करु कता. 18 वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांचे नाव पालकांच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट करता येते. मात्र 18 वर्षांवरील सर्व जण आपल्यासाठी स्वतंत्र रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता.
उदाहरणार्थ, आपण उत्तर प्रदेशचे रहिवासी असाल तर https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx वर क्लिक करुन फॉर्म डाउनलोड करु शकता. जर आपण बिहारचे रहिवासी असाल तर hindiyojana.in/apply-ration-card-bihar/ वर क्लिक करुन अर्ज करु शकता. ऑनलाईन अर्जासाठी आयडी प्रूफसाठी आधार कार्ड्स, व्होटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देवू शकता. याव्यतिरिक्त सरकारद्वारे जारी केलेले कोणतेही आय कार्ड, हेल्थ कार्ड देखील ओळखपत्राच्या स्परुपात देऊ शकता.
किती आहे फी?
रेशन कार्ड बनवण्यासाठी 5 रुपये ते 45 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. अर्ज भरल्यानंतर फी फी जमा करा आणि त्यानंतर शुल्क जमा करा आणि आपला अर्ज सबमिट करा. फील्ड व्हेरिफिकेशन नंतर आपला अर्ज योग्य असेल तर आपले रेशन कार्ड बनवेल. एनएफएसएच्या अंतर्गत सरकार कार्डधारी प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला पाच किलो गहू आणि तांदूळ 2 ते 3 रुपये किलो दराने उपलब्ध करते. वर्ष 2013 मध्ये लागू केलेल्या या कायद्याअंतर्गत 80 कोटी लोकांचा समावेश आहे. (Make this document to get wheat and rice for free, complete information given by the government)
TV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमतीhttps://t.co/Qcaqquureg#Nashik | #OnionAuction | #Lasalgaon | #OnionPriceToday
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2021
इतर बातम्या
नवी मुंबईत विशेष कोव्हिड लसीकरण सत्र, दिव्यांग, निराधार, व्याधीग्रस्त महिलांसाठी खास सुविधा
तीन भारतीय क्रिकेटपटू अटकेत, मॅच फिक्सिंगप्रकरणी दिग्गज फलंदाजाकडून गुन्हा कबूल, क्रिकेट जगतात भूकंप