Marathi Bhasha gaurav Din : आज मराठी भाषा गौरव दिन, तुमच्या प्रियजनांना द्या मराठीत शुभेच्छा
21 जानेवारी 2013 मध्ये या 27 फेब्रुवारा या त्यांच्या वाढदिवसाच्या ऐतिहासिक दिवसाला मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha gaurav Din Message) म्हणून घोषित केले. या विशेष दिनी तुमच्या प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा.
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचे महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगादानामुळे महाराष्ट्र शासानाने 21 जानेवारी 2013 मध्ये या 27 फेब्रुवारा या त्यांच्या वाढदिवसाच्या ऐतिहासिक दिवसाला मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha gaurav Din Message) म्हणून घोषित केले. अलीकडे कोणताही सण हा सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही, मग आज आपल्या भाषेला समर्पित या दिवसाच्या खास शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना नक्की द्या.
मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा संदेश
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी सर्व मराठी बांधवांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।। मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
मराठी माझी जात! मराठी माझा धर्म! मराठी माझी माती! मराठी माझं रक्त! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
“मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवाना… मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
रुजवू मराठी, फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!