मराठी भाषा दिन | ‘ही’ आहेत मराठीतील 10 लोकप्रिय पुस्तकं, तुम्ही कोणती वाचलीत ?

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...' 27 फेब्रुवारीचा हा दिवस सर्वत्र ‘मराठी भाषा दिन‘ म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध कवी, लेखक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांची आज जयंती.

मराठी भाषा दिन | 'ही' आहेत मराठीतील 10 लोकप्रिय पुस्तकं, तुम्ही कोणती वाचलीत ?
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 1:58 PM

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ 27 फेब्रुवारीचा हा दिवस सर्वत्र ‘मराठी भाषा दिन‘ म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध कवी, लेखक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांची आज जयंती. त्यामुळे आजचा दिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मकाठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आजच्या या दिवशी मराठीतील खास, प्रसिद्ध , 10 लोकप्रिय, दर्जेदार पुस्तकांबद्दल जाणून घेऊया. ही पुस्तकं तुम्हीदेखील वाचली असतील, चला मग ही पुस्तकं कोणती, त्यांची नाव काय हे जाणून घेऊया.

1) मृत्युंजय – शिवाजी सावंत

मराठीतील प्रसिद्ध कादंबऱ्यांपैकी असलेल्या या कादंबरीचे लेखक आहेत, शिवाजी सावंत..महाभारतातील ‘कर्ण’ या व्यक्तीरेखेवर आधारित ही मराठी कादंबरी आहे. या कादंबरीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ही कादंबरी मुख्यतः कर्णावर आधारित आहे. पण या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे यात एकाच व्यक्तीरेखेची गोष्ट नाही. तर महाभारतातील विविध व्यक्तीरेखा या पुस्तकातून आपल्या भेटीस येतात आणि त्यांचा जीवनपट उलगडतात. एकदा तरी ही कादंबरी वाचलीच पाहिजे.

2) ययाती – वि. स. खांडेकर

वि.स.खांडेकराची ही प्रसिद्ध कांदबरी पौराणिक घटनांवर आधारित आहे. या कादंबरीतील प्रमुख पात्रं म्हणजे ययाती, देवयानी, शर्मिष्ठा आणि कच ही आहेत. ययाती या वि स खांडेकरांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने आणि जनपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

3) श्रीमान योगी – रणजित देसाई

शिवाजी टिकतो, की नाही, हा प्रश्न नाही. राज्य टिकतं, की नाही, हा सवाल आहे. राज्य राखलंत, तर असे दहा शिवाजी येतील! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित श्रीमान योगी ही ऐतिहासिक कादंबरी आहे. रणजीत देसाई यांनी या उत्कृष्ट कादंबरीचं लेखन केलं असून त्यांच्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक मानलं जातं. काळजाला हात घालणारं हे पुस्तक प्रत्येक इतिहासप्रेमीने वाचलंच पाहिजे, असं आहे.

4) बटाट्याची चाळ – पु.ल. देशपांडे

महाराष्ट्राच लाडकं व्यक्तीमत्व म्हणून पु.ल. देशपांडे सर्वपरिचित आहेत. त्यांचं बटाट्याची चाळ हे पुस्तक अगदी कोणीही वाचू शकतं. इतक्या सहज, सोप्या भाषेत ते पुलंनी लिहीलं आहे. यातील द्वारकानाथ गुप्ते, बाबा बर्वे, कोचरेकर, काशीनाथ नाडकर्णी, जनोबा रेगे, समेळ काका, कुशाभाऊ आक्शीकर आणि रघुनाना सोमण ही पात्र तुमच्या नक्कीच लक्षात राहतील.

5) पानिपत – विश्वास पाटील

पानिपताचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास या पुस्तकाला पर्याय नाही. विश्वास पाटील यांनी लिहीलेली ही कादंबरी खरंतर सगळ्यांकडे हवीच, अशी आहे. पानिपतावर झालेल्या तिसऱ्या युद्धाची कथा यात आहे. मराठीत लिहीलेलं पुस्तक नंतर इंग्रजी भाषेतही भाषांतरित करण्यात आलं.

6) दुनियादारी – सुहास शिरवळकर

मराठीतील प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकरांची ही कादंबरी बरीच लोकप्रिय. त्यावर एक मालिका आणि नंतर एक चित्रपटही आला.दुनियादारी ही तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या दुनियेत ही कांदबरी नक्कीच नेईल. ही कादंबरी 70 च्या दशकातली असली तरी यातील कॉलेजमधील स्लँग आणि जोक्स तुम्हाला आजही अपील करतात. हे पुस्तक वाचायला हातात घेतल्यावर ते वाचून संपवल्याशिवाय तुम्ही खाली ठेवणारच नाही.

7) राधेय – रणजित देसाई

महाभारतामधील कर्णाच्या आयुष्यावरील हे आणखी एक पुस्तक. राधेय या कादंबरीत लेखक रणजीत देसाई यांनी एका महत्त्वाच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. तो प्रश्न म्हणजे जे योग्य आहे ते करणं याविरूद्ध जे आपलं कर्तव्य ते करणं. जे महाभारतातील कर्णाच्या भूमिकेतून मांडण्यात आलं आहे. या पुस्तकातून देसाई यांनी वाचकांपर्यत हे पोचवण्याचा प्रयत्न केला आहे की, प्रत्येकवेळी युद्ध जिंकण हा जरी हेतू असला ती आपण हरण्यासाठीही मनाची तयारी केली पाहिजे.

8) व्यक्ती आणि वल्ली – पु.ल. देशपांडे

व्यक्तीचित्रण करण्यात पुलंचा हात कोणीच धरू शकत नाही. व्यक्ती आणि वल्ली हे त्यांनी केलेल्या काही पात्रांच्या वर्णनाचा संग्रह आहे. ही सर्व पात्रं आयुष्यातील खऱ्या व्यक्तींवर आणि घटनांवर आधारित आहेत. यामध्ये 20 कथा आहेत. नारायण ते गंपू अशी विविध ढंगी पात्र व्यक्ती आणि वल्लीमध्ये आपल्याला भेटतात. यातील सर्वात गाजलेलं पात्र म्हणजे सखाराम गटणे. या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता.

9) श्यामची आई – साने गुरूजी

प्रत्येक घरात आवर्जून असलं पाहिजे आणि प्रत्येकाने वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक आहे. साने गुरूजींनी लिहीलेलं हे पुस्तक मराठी साहित्यातील अजरामर कलाकृती आहे. कित्येक दशकं उलटूनही हे पुस्तक आजही तितकंच परिणामकारी आहे. या पुस्तकात आईचं प्रेम आणि आईने आपल्या मुलांना दिलेलं शिकवण आहे. खासकरून श्याम म्हणजे साने गुरूजी यांच्या उत्तम माणूस म्हणून घडण्याची कथा यात आहे. या पुस्तकाची सुरूवात शाम आपल्या आश्रमातील मुलांना आईच्या आठवणी कथे स्वरूपात सांगतो अशी आहे. प्रत्येक कथेत काही ना काही शिकवण आहे.

10) एक होता कार्व्हर – वीणा गवाणकर

आफ्रिकन-अमेरिकन शास्त्रज्ञ आणि शेतीतज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या आयुष्यावर 30 वर्षांपूर्वी वीणा गवाणकर यांनी लिहीलेलं हे आत्मचरित्र आजही मराठीतील बेस्ट सेलर्सपैकी एक आहे. एका माणसाचा आयुष्यातील सर्व अडथळ्यांना पार करून यशाच्या दिशेने केलेला प्रवास आहे. कार्व्हर यांनी बॉटनी आणि शेतीसाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. गवाणकर यांनी साध्या सोप्या आणि सरळ शब्दात कार्व्हर यांचा हा प्रवास मांडला आहे. आता हे पुस्तक ऑडिओ रूपातही उपलब्ध असून याच्या 34 आवृत्ती काढण्यात आल्या आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.