Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neil Armstrong : चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता का ? जाणून घ्या सत्य

52 वर्षांपूर्वी 20 जुलै 1969 साली मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. अमेरिकतील नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती ठरले होते. आज त्यांची पुण्यतिथी आहे.

Neil Armstrong : चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता का ? जाणून घ्या सत्य
चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता का ?Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 4:05 PM

अमेरिकतील अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong) यांनी 20 जुलै 1569 रोजी चंद्रावर पहिल्यांदा पाऊल (1st man on moon) ठेवले होते. हा एक असा क्षण होता, ज्याची इतिहासात (golden words in history) सुर्वणाक्षरांत नोंद करण्यात आली. जगभरात नील यांचे खूप कौतुक झाले. चंद्रावरून परत आल्यानंतर जगभरातील लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र काही लोक असेही होते जे त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करत होते. मात्र ही बाब इथेच थांबली नाही. त्यावेळी अशीही चर्चा सुरू झाली होती की, नील आर्मस्ट्राँग यांना चंद्रावर अजान ऐकायला आली व त्यांनी इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला आहे. ही घटना किती खरी आणि किती खोटी याबाबत जगभरातील लोकांमध्ये चर्चा सुरू होती. एवढेच नव्हे तर नील आर्मस्ट्राँग यांच्या आत्मचरित्रातही या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता. आज नील आर्मस्ट्राँग यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्याबद्दल झालेल्या या चर्चेत किती सत्य होते आणि किती खोटं, हे जाणून घेऊया.

कधी आणि कसा सुरू झाला इस्लामवरून वाद ?

नील आर्मस्ट्राँग आणि इस्लाम याबद्दल 1980 साली चर्चा सुरू झाली. ‘चंद्रावर असताना अपोलो -11 च्या क्रू मेंबर्सनी एक खास आवाज ऐकला होता, मात्र त्यांना त्या आवाजाचा अर्थ समजू शकला नाही’ असा युक्तिवाद, वाद-विवाद करणाऱ्या लोकांनी केला होता. काही वेळानंतर नील हे जेव्हा इजिप्त येथे पोहोचले, तेव्हा त्यांना तिथेही आावाज ऐकू आला. नील यांनी लोकांकडे त्या आवाजासंदर्भात चौकशी केली असता तो अजान असल्याचे लक्षात आले. ते ऐकल्यानंतर नील यांनी इस्लाम धर्म स्वीकारला, असे अनेक रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले होते.

इस्लामशी संबंधित पूर्ण सत्य काय आहे, ते जाणून घ्या

चंद्रावरील ज्या घटनेचा उल्लेख करत त्याचा इस्लामशी संबंध जोडण्यात आला, त्याचे संपूर्ण सत्य काही वेगळेच होते. खरंतर, नील आर्मस्ट्राँग हे दुसरे अंतराळवीर एडविन आल्ड्रिन यांच्यासह चंद्रावर गेले होते. नील यांच्या आगमनानंतर 19 मिनिटांनी ते (एडविन) चंद्रावर उतरले. त्या सर्वांनी चंद्रावर काही तास घालवले. एडविन यांनी गाईडपोस्ट्स मासिकाला दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण घटनेचा उल्लेख केला होता. ते म्हणाले की, जेव्हा मी चंद्रावर उतरलो, तेव्हा तिथे शांतता पसरली होती. कोणताही आवाज आला नाही. तिथे मी चर्चमधून आणलेल्या वाईनचे सेवन केले, असे त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा

एडविन यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान कोणत्याही आवाजाचा उल्लेख केला नाही. एक अफवा पसरल्यानंतर सत्य काय आहे याची पडताळणी न करताच, मलेशिया, इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये नील आर्मस्ट्राँग यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची खोटी बातमी पसरली. ही अफवा पसरताच नील आर्मस्ट्राँग यांनी एशियन रिसर्च सेंटर इंटरनॅशनल ख्रिश्चन फेलोशिपचे संचालक फिल पार्शल यांना पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं. चंद्रावर आवाज ऐकण्यात आल्याची आणि इस्लाम धर्म स्वीकारल्याची चर्चा खोटी आहे, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते.

एवढंच नव्हे तर या घटनेबद्दल एवढा अपप्रचार झाला की नील आर्मस्ट्राँग यांना त्यांच्या चरित्रातही याचा उल्लेख करणे भाग पडले. इस्लाम धर्म स्वीकारण्याबाबत अनेक वेळा अफवा पसरवल्या गेल्या, असे त्यांच्या चरित्रात लिहिले होते.

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.