एकाच ट्रॅकवर समोरासमोर गाडी आली तरी चिंता नाही! भारतीय रेल्वेचं ‘कवच’ नेमकं आहे तरी काय?

| Updated on: Mar 06, 2022 | 11:28 AM

भारतीय रेल्वेला रक्षण कवच प्राप्त झालेले आहे. हे संरक्षण कवच भारतीय उद्योग यांच्या मदतीने अनुसंधान डिझाईन आणि मानक संघटनाद्वारे ( आरडीएसओ) एका स्वदेशी रूपामध्ये विकसित केली गेली. ही एक एटीपी प्रणाली आहे. भारतीय रेल्वेमध्ये ट्रेन संचलनाच्या सुरक्षा संदर्भातील हेतू लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने या कवचाची तपासणी केली.

एकाच ट्रॅकवर समोरासमोर गाडी आली तरी चिंता नाही! भारतीय रेल्वेचं कवच नेमकं आहे तरी काय?
रेल्वे कवच
Follow us on

मुंबई : भारतीय रेल्वेची(Indian Railway) सुरक्षितता ध्यानात घेऊन भारत सरकारने आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने दिवस-रात्र नव नव्या तंत्रज्ञानावर आधारित गोष्टींचा उपयोग रेल्वेसाठी कसा होईल याचे प्रयत्न चालू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून देशात रेल्वेचे अपघाती (Accident) घटना थांबायचे काही नाव घेत नाही, त्यामुळे जीवितहानी सोबतच रेल्वे हानी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. या घटना थांबवण्यासाठी भारतीय रेल्वे आणि भारत सरकार यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेने नुकतेच एक कवच जाहीर केले आहे. हे कवच एका तंत्रप्रणाली च्या आधारावर कार्य करते. या प्रणालीच्या आधारावर रेल्वे अपघातावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. केन्‍द्रीय रेलवे संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स , सूचना प्रौद्योगिकी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी शुक्रवारी दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद मंडळ येथे लींगंपल्ली विकाराबाद जंक्शन वर गुल्लागुडा-चिटगिड्डा रेल्वे स्टेशन दरम्यान या कवच कार्यप्रणालीची टेस्टिंग केली. या प्रसंगी रेलवे बोर्ड चे अध्यक्ष आणि सीईओ वी.के. त्रिपाठी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

कवच मुळे एकमेकांसमोर आलेल्‍या ट्रेन आपोआप थांबल्या

केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये कवच ची तपासणी केली गेली. रेल्वेमंत्री स्वतः स्वचलित इंजिनवर उपस्थित होते,हे इंजिन ने गुल्लागुडा ते चिटगिड्डा कडे प्रवास केला. या चाचणी च्या दरम्यान दोन रेल्वे एकमेकांसमोर आल्या परंतु अशावेळी टक्कर ची स्थिती निर्माण केली गेली प्रणालीने स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टमचा वापर करून इंजिनला 380 मीटरच्या अंतरावरच थांबवले. सोबतच लाल दिव्याचा पार करण्याचा चाचणी देखील केली गेली.तसे तर इंजिन ने लाल दिवा दर्शवला नाही परंतु कवच ला स्वचालित पद्धतीमध्ये ब्रेक लावणे शक्य झाले

गेट सिग्नल जवळ आल्यावर इंजिनची स्वयंचलित सिटीचा आवाज वेगाने आणि स्पष्टपणे ऐकू आला.

मोटर मॅन ने तपासणी करतेवेळी ध्वनी आणि बेकिंग सिस्टिम मला अजिबातच हात लावला नव्हता जेव्हा इंजिनला लूप लाईनवर चालवले गेले तेव्हा 30 किलोमीटर प्रति तास गतीने चाचणी केली गेली नाही इंजिनच्या 60 किलोमीटर प्रति तासाची असलेली गती स्वयंचलित रूपाने 30 किलोमीटर प्रति तासापर्यंत कमी करून लूप लाईन मध्ये प्रवेश केले.

काय आहे नेमके हे कवच

हे कवच म्हणजे भारतीय उद्योग यांच्या मदतीने अनुसंधान डिझाईन आणि मानक संघटन द्वारा एका स्वदेशी रूपामध्ये विकसित असलेली एटीपी प्रणाली आहे. भारतीय रेल्वे ट्रेन संचालनमध्ये सुरक्षतेचा हेतू लक्षात घेऊन या तंत्र प्रणालीची निर्मिती करण्यात आली त्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने या कवचाची तपासणी केली. हे कवच संपूर्णपणे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तयार केले गेलेले एक आधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे.हे कवच रेल्वेने लाल सिग्नल पार केल्यानंतर आणि टक्कर थांबवण्याच्या दृष्टीकोणातून सुरक्षा प्रदान करणारे ठरणार आहे.जर एखादे वेळी मोटर मॅन वेगाने चालणाऱ्या रेल्वेला नियंत्रण करण्यास जर अयशस्वी ठरल्यास अशा वेळी या कवचाच्या आधारे दोन ट्रेन मधील होणारा अपघात सहजरीत्या थांबवता येऊ शकतो.

या कवचाची वैशिष्ट्ये

1 धोक्याच्या वेळी सिग्नल पार करण्यापासून थांबवतो
(एसपीएडी)

2. ड्रायवर मशीन इंटरफेस (डीएमआई) / लोको पायलट ऑपरेशन मध्ये सिग्नल दिसल्यावर ट्रेन आवाजाला निरंतर अपडेट करतो.

3 इंडिकेशन पॅनल (एलपीओसीआईपी) मध्ये सिग्नल दिसल्यावर ट्रेनच्या आवाजात सातत्याने अपडेट देत असतो.

4 ओवर स्पीडिंग झाल्यावर रेल्वे थांबण्यासाठी स्वयंचलित ब्रेक लावणे

5 फाटकाजवळ पाऊस आज वेळेवर ऑटो सिटी वाजवणे.

6 या कवच मुळे दोन इंजिन एकमेकांना टक्कर देणार नाहीत.

7 आपत्कालीन परिस्थिती दरम्यान संदेश दिला जाईल

8 नेटवर्क मॉनिटर सिस्टम च्या माध्यमातून रेल्वेच्या घडणाऱ्या हालचाली घटनेबद्दल थेट प्रक्षेपण केले जाईल.

संबंधित बातम्या:

जर तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये दारू घेऊन जायचे असेल, तर हे नियम माहिती असायलाच हवे!

असे युद्ध ज्यात 5 कोटींपेक्षा जास्त लोक मारले गेले, जाणून थक्क व्हाल युद्धामागील रक्तरंजित कहाणी

प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे..? ,जाणून घेऊया भारतीयांचे विचार !