आवडत्या महिलांना बर्फाच्या स्विमिंग पूल भोवती उभे करायचे अन्…; हे प्रसिद्ध महाराज कोण माहितीये?
भारतातील एक असे महाराज ज्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी फारच विचित्र होत्या. ते जेवणात पक्षांचा मेंदूही खायचे. एवढच नाही तर त्याचा हरम आणि त्यात राहणाऱ्या महिलांच्या गोष्टीही तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. कोण होते हे महाराज?
आपल्याला आपला इतिहास जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. त्यात महत्त्वाचं म्हणजे राजा- महाराजांच्या गोष्टी जाणून घेण्यात फार रस असतो. त्यांच्या वेळेसचा तो काळ, त्यांचा पहेराव, दागिने एवढच नाही तर त्यांचे खाद्य कसे असेल याबद्दल जाणून घेण्यास आपल्याला फार आतुरता लागलेली असते.
असेच एक महाराज होते ज्यांच्याविषयी अनेक गोष्टी प्रसिद्ध आहे. त्यांच्या पेहरावापासून ते त्यांच्या खास जीवनशैलीसाठी त्यांच्या चर्चा आजही होतात आणि त्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलं जातं.
350 राण्या होत्या
हे महाराज म्हणजे महाराजा भूपिंदर सिंग. पटियाला राज्याचे एक महान राजा. महाराजा भूपिंदर सिंग त्यांच्या विलक्षण ऐश्वर्य आणि विलासिता यासाठी ओळखले जात होते. या महाराजांच्या 350 राण्या होत्या. तसेच ते दिवसाला तब्बल 9 किलो अन्नाचा आहार करत असतं असही म्हटलं जातं.
महाराजांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी फारच विचित्र होत्या
महाराजा भूपिंदर सिंह यांना जेवणाची खूप आवड होती. ते दिवसाला 20 पौंड अन्न खात असे, किंवा चहाच्या वेळी दोन कोंबड्या खात असे. महाराजांची जेवण खाण्याची पद्धत खूपच अनोखी होती.
असे म्हटले जाते की, तो पक्ष्याचा मेंदूही खात असे. त्यांचे जेवण केवळ विपुल नव्हते तर विविधतेने भरलेले होते. असे लॅरी कॉलिन्स आणि डोमिनिक लॅपियर त्यांनी त्यांच्या ‘फ्रीडम एट मिडनाईट’ या पुस्तकात हे सर्व लिहिलं आहे.
महाराजांचे हरम आणि महिलांच्या गोष्टी
महाराजा भूपिंदर सिंग यांच्या शारीरिक इच्छांबद्दल काही मनोरंजक तथ्येही देखील समोर आली आहेत. त्याच्याकडे एक प्रचंड हरम होता ज्यामध्ये त्यांच्या 350 राण्या होत्या.
त्यांनी त्यांच्या हरममधील महिलांचे सौंदर्य आणि आकर्षण आणखी वाढवण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटनमधील प्लास्टिक सर्जननाही बोलावले होते. यावरून असे दिसून येते की, तो त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मागचा-पुढचा विचार करत नसतं.
पटियालामध्ये असे म्हटले जात होते की, महाराजा त्यांच्या आवडत्या महिलांना बर्फाने भरलेल्या स्विमिंग पूलभोवती ठेवत असत जेणेकरून ते त्यांना एका हाताने स्पर्श करू शकतील किंवा पोहताना व्हिस्कीचा ग्लास घेऊ शकतील. त्यात त्याच्या जीवनातील विलासिता आणि त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी लक्षात येतात.
महाराजा आणि अॅडॉल्फ हिटलर यांच्यात होती खास मैत्री
या महाराजांचे आणि हिटरलचे खूप खास संबंध होते असही म्हटलं जातं. 1935 मध्ये जर्मन चांसलर अॅडॉल्फ हिटलरने त्यांना एक आलिशान मेबॅक कार भेट दिली होती. ही गाडी त्यांच्या आणि हिटलरमधील खास नात्याचे प्रतीक बनली. या घटनेवरून असे दिसून येते की, महाराजांचे केवळ भारतातील राजघराण्यांशीच नव्हे तर परदेशातील राजघराण्यांशीही संबंध होते.