येथे केली जाते सापांची शेती, लोकं कमावतात करोडो रुपये

साप पाहताच लोकं पळतात किंवा त्याला मारून टाकतात. पण, जगात असा एक देश आहे जिथं लोकं सापाची शेती करतात. त्यातून कोट्यवधी रुपये कमावतात.

येथे केली जाते सापांची शेती, लोकं कमावतात करोडो रुपये
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 7:38 PM

भारत कृषीप्रधान देश आहे. देशात अन्नधान्य, फळं आणि भाजीपाल्याची शेती केली जाते. मत्स्योत्पादन, कोंबडी पालन तसेच इतर काही व्यवसायही केले जातात. परंतु, तुम्हाला सापाची शेती करा म्हंटलं तर परेशानी होईल. आता तुम्हाला सापाची शेती आणि त्यातून केली जाणारी कमाई याची माहिती देत आहोत. साप पाहताच लोकं पळतात किंवा त्याला मारून टाकतात. पण, जगात असा एक देश आहे जिथं लोकं सापाची शेती करतात. त्यातून कोट्यवधी रुपये कमावतात. सापाची शेती करणाऱ्या देशाचे नाव तुमच्यासाठी काही नवीन नाही. तो देश म्हणजे चीन होय. चीनच्या जीसीकियाओ गावांमध्ये लोकं सापाची शेती करतात. त्यातून मोठ्या प्रमाणात कमाई करतात. या गावाचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत साप पालन असा आहे. यामुळे गावाला स्नेक व्हिलेज म्हणतात.

जगात सापांच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात घरोघरी सापाची शेती केली जाते. गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे. येथे राहणारे व्यक्ती सुमारे तीस हजार सापांचे पालन करतो. यावरून किती रुपयांची उलाढाल होत असेल याचा अंदाज येतो.

सापाच्या मांसापासून फायदा

जीसीकियाओ गावात विषारी सापही पाळले जातात. कोबरा सापाच्या विषामध्ये वीस लोकांना मारण्याची क्षमता असते. येथील मुलं खेळण्याऐवजी सापांशी खेळतात. सापांचे मांस तसेच विष विक्री करून लोकं करोडो रुपये कमावतात. सापाचे विष सोन्यापेक्षाही जास्त महाग आहे. सर्वात जास्त विषारी सापाचे एक लीटर विष हे तीन कोटी रुपयांचे होते.

चीनमध्ये सापाचे मासही खाल्ले जाते. यातून लोकं लाखो रुपये कमाई करतात. भारतात पनीर खातात, तसा चीनमध्ये साप खातात. सापांना लाकडाच्या किंवा काचाच्या बॉक्समध्ये पाळले जाते. सापाच्या चामड्यापासून बेल्ट तसेच इतर सामान बनवले जाते.

कशी आली कल्पना

येंग होंग चेंग नावाचा शेतकरी होता. तो आजारी पडला. गरिबीमुळे तो उपचारासाठी पैसे जमा करू शकला नाही. स्वतःच्या उपचारासाठी जंगली सापाला पकडून औषध तयार केली. स्वतःचे प्राण वाचवले. शिवाय दुसऱ्यांचेही प्राण वाचवले. तेव्हापासून गावात सापांची शेती सुरू झाली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.