Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डुकरासारखं तोंड, पण, माणसाला बहाल करू शकतो अमरत्व, शास्त्रज्ञांनी शोधली त्याची कहाणी

या प्राण्याला आठ पाय आहेत. हा सूक्ष्म जीव अत्यंत उष्णतेमध्ये आणि गोठवणाऱ्या थंडीतही मरत नाहीत. ज्या अंतराळात माणसं 2 मिनिटे सुद्धा जगू शकत नाहीत तिथे तो सहज काही वेळ घालवू शकतो.

डुकरासारखं तोंड, पण, माणसाला बहाल करू शकतो अमरत्व, शास्त्रज्ञांनी शोधली त्याची कहाणी
Tardigrade Animal Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 10:11 PM

नवी दिल्ली | 8 फेब्रुवारी 2024 : जगात अनेक अनोखे प्राणी आहेत ज्यांच्यावर अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले आहे. यातून मानवाला फायदा झाला आहे. तरीही या निसर्गात असे अनेक प्राणी लपून आहेत की त्यांची माहिती शास्त्रज्ञांना नाही. अशाच प्राण्यांपैकी एका प्राण्याचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. विशेष म्हणजे या प्राण्याचे असे जनुक आहेत की त्याच्या वापरामुळे मानवाला अमरत्व बहाल होईल. कारण, हा प्राणी कोणत्याही वातावरणात जिवंत राहतो. इतकेच नव्हे तर अंतराळामध्ये जिथे कोणताही जीव वाचू शकत नाही तिथेही हा प्राणी जिवंत राहतो.

वातावरण कितीही गरम असले किंवा कडाक्याची थंडी असली तरी अशा वातावरणात हा प्राणी कधीच मरत नाही. अंतराळातही तो आपला जीव वाचवतो. या प्राण्याचे नाव आहे टार्डिग्रेड्स. (Tardigrade) या प्राण्याला आठ पाय आहेत. हा सूक्ष्म जीव अत्यंत उष्णतेमध्ये आणि गोठवणाऱ्या थंडीतही मरत नाहीत. ज्या अंतराळात माणसं 2 मिनिटे सुद्धा जगू शकत नाहीत तिथे तो सहज काही वेळ घालवू शकतो.

शास्त्रज्ञांनी दीर्घ संशोधनानंतर त्यांची कहाणी शोधून काढली आहे. या प्राण्याबद्दल शास्त्रज्ञ इतकेच सांगतात की पृथ्वीवर कोणतीही आपत्ती आली तरी हा प्राणी आपला प्राण वाचवू शकतो. कारण, त्यांच्यात एक विशेष प्रकारचा जनुक आहे. टार्डिग्रेड्स हिमालयात, समुद्राच्या खोलवर, ज्वालामुखीच्या चिखलात आणि अगदी अंटार्क्टिकामध्ये उणे 80 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात आढळले आहेत. ते पाण्याशिवायही जगू शकतात असे शास्त्रज्ञांना संशोधनानंतर दिसून आले.

शास्त्रज्ञांना त्याचे रहस्य जाणून आश्चर्य वाटले. कठीण परिस्थितीत हे टार्डिग्रेड्स क्रिप्टोबायोसिसच्या टप्प्यात जातात. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये ते शरीरातील सर्व पाणी काढून टाकतात. त्यांच्या शरीरात फक्त विशेष प्रथिने आणि साखर राहते. जे त्यांच्या पेशी कधीही मरू देत नाहीत. मग काही महिने किंवा वर्षांनंतर जेव्हा त्यांना पुन्हा पाणी मिळते तेव्हा ते आपल्या पेशी पुन्हा पाण्याने भरतात. त्यामुळे त्यांना पुन्हा संजीवनी मिळते.

टार्डिग्रेड्सच्या सडपातळ शरीरामुळे काही लोक त्याला जल अस्वल किंवा जलीय अस्वल या नावाने देखील ओळखतात. टार्डिग्रेड्सचा आकार एक मिलीमीटरपेक्षा मोठा नसतो. शास्त्रज्ञांच्या मते टार्डिग्रेड्स याची जनुके मिळाली तर कदाचित मानवही अमर होईल. पण ते कठीण आहे, कारण हा प्राणी अगदी खोल अशा ठिकाणी आपले वास्तव्य करून राहतो.

याशिवाय आणखी असा एक जीव आहे जो अतिउष्ण आणि थंडीतही तग धरून राहतो. त्याला ‘येती क्रॅब’ किंवा ‘यती खेकडा’ असे म्हणतात. कठीण कवच असलेला हा प्राणी पाहू शकत नाही. समुद्र सपाटीपासून 2,300 फूट खाली हा प्राणी राहतो. येथपर्यंत सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही. त्यांच्या राहत्या ठिकाणाहून 400 अंश सेल्सिअस पर्यंत गरम पाणी बाहेर येते.

खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.