मुघल बादशाहाला धक्का, पेटाऱ्यातून कशी केली शिवाजी महाराज यांनी सुटका
दरबारात शिवाजी महाराज यांना रांगेत उभे राहावे लागले. बादशाहाचे नजर त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नव्हती.
Mughal History: छत्रपती शिवाजी महाराज मुघलांची कपटनीती जाणून होते. औरंगजेबाच्या शाही दरबारापुढे झुकले नाही. एक दिवस त्यांनी चिठ्ठी मिळाली. पत्राच्या माध्यमातून औरंगजेबाच्या दरबारात येण्याचे आमंत्रण मिळाले. शिवाजी महाराज यांना असं वाटलं की, कदाचित भेटीनंतर दख्खनचे व्हाईसराय बनवले जाईल. विजापूर आणि गोलकोंडा आपल्या ताब्यात देण्यासाठी मोठी सेना देईल. शिवाजी महाराज यांना पत्राच्या माध्यमातून कळवण्यात आलं होतं. दक्षिणेतील औरंगजेबाचे व्हाईसराय मिर्झा राजे जयसिंह यांनी शिवाजी महाराज यांना औरंगजेबाच्या दरबारात पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आपल्या शिवाजी एंड हीज टाईम्स मध्ये प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी खुबीने हा प्रसंग सांगितला आहे. ते म्हणतात, औरंगजेबाच्या भेटीपूर्वी शिवाजी महाराज यांच्याशी जे बोलण झालं होतं, त्यात काही तत्थ्य नव्हतं.
पत्रात सन्मानाचा उल्लेख पण, झाला अपमान
शिवाजी महाराज यांना वाटले की, भेटीनंतर त्यांना विजापूरमधून कर वसूल करण्याची परवानगी मिळेल. मराठा दरबारातील चर्चेनंतर ठरले की त्यांना आगरा येथे भेटायचे आहे. ५ मार्च १६६६ ला जबाबदारी राजमाता जीजाऊ यांना सोपवून शिवाजी महाराज आगऱ्याच्या दिशेने निघाले.
पत्रात स्पष्ट लिहिले होते की, शिवाजी महाराज यांना सन्मानाने दरबारात आणले जावे आणि घरी पोचवून द्यावे. बादशाह स्वागत करतील. पण, ९ मे रोजी आगरा येथे शिवाजी महाराज पोहचले तेव्हा तिथं साध्या शिपायाने त्यांचे स्वागत केले. १२ मे रोजी औरंगजेबाने भेटण्याची वेळ दिली. शिवाजी महाराज मुलगा संभाजी आणि दहा साथीदारांसोबत बादशाहाच्या दरबारात पोहचले.
शिवाजी महाराज यांचा अपमान
दरबारात शिवाजी महाराज यांना रांगेत उभे राहावे लागले. बादशाहाचे नजर त्यांच्यापर्यत पोहचू शकत नव्हती. दोन हजार सोन्याचे शिक्के आणि सहा हजार रुपये तोफा म्हणून दिले. तीन वेळा सलाम केला, तरीही बादशाहाने जवाब दिला नाही. शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाचा हा व्यवहार पसंत आला नाही. औरंगजेबाने शिवाजी महारा यांना आगरा शहराच्या बाहेर जयपूर सरायमध्ये थांबण्याचे आदेश दिला. शिवाजी महाराज यांनी भवन सोडू नये असा आदेश देण्यात आला.
अशी केली सुटका
शिवाजी महाराज यांना खाण्यापिण्याच्या वस्तू मागवणे सुरू केले. काही दिवस तपासण्या केल्यानंतर सैनिक शांत झाले. एक दिवस शिवाजी महाराज आजारी असल्याचा बहाणा केला. कन्हण्याचा आवाज सैनिकांना बाहेरपर्यंत ऐकू जात होता. फळ आणि इतर वस्तू येत होत्या. शिवाजी महाराज वेषांतर करून पेटाऱ्यात बसले. शिवाजी महाराज यांच्या बेडवर हिरोजी फरजांद यांना झोपवण्यात आले. दीड दिवसानंतर सैनिकांच्या लक्षात ही बाब आली. शिवाजी महाराज यांनी संभाजीसोबत स्वतःची सुटका करून घेतली होती. याचा चांगलाच झटका औरंगजेबाला बसला.