success Story : 12 नापास झाला, कॉलेज सोडलं, तरीही कसे झाले तीन कंपन्यांचे मालक?
सुशील सिंह यांचा पहिला पगार ११ हजार रुपये होता. स्वतःच्या मेहनतीवर आता ते सहा आकडी पगार कमवतात.
मुंबई : अपयशातून शिकत असालं तर यशाचा मार्ग तुम्हाला खुणावतो. उत्तर प्रदेशातील सुशील सिंह यांनी असं काहीतरी वेगळं करून दाखवलं. आज ते तीन कंपन्यांचे मालक आहेत. देशातील करोडपती व्यवसायिक आहेत. सुशील सिंह सध्या तीन नफ्यातील कंपन्यांचे मालक आहेत. सुशील सिंह यांची कहाणी प्रेरणादायी आहे. सुशील आज एसएसआर टेकव्हीजन, डीबाको, साईवा सिस्टीम इंकचे मालक आहेत.
११ हजार रुपये होता सुशील सिंह यांचा पहिला पगार
सुशील सिंह यांचा पहिला पगार ११ हजार रुपये होता. स्वतःच्या मेहनतीवर आता ते सहा आकडी पगार कमवतात. सुशील सिंह यांचे कुटुंब रोजगारासाठी जौनपूरवरून मुंबईत आले. आई घर सांभाळत होती. वडील बँकेत सुरक्षा गार्ड होते. ते डोंबीवलीतील एका चाळीत राहत होते. डोंबीवली हे शहर मुंबईजवळ आहे.
सुशील यांनी हिंदी माध्यमातून शिक्षण घेतले
सुशील सिंह यांनी डोंबीवलीतील महापालिकेच्या एका हिंदी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतले. द बेटर इंडिया रिपोर्टनुसार, सुशील सिंह दहावीपर्यंत अभ्यासात हुशार होते. त्यानंतर त्यांना शिक्षणात रुची राहिली नाही. बारावीत पहिल्या प्रयत्नात नापास झाले. परंतु, दुसऱ्या वर्षी पास झाले.
सुशील सिंह यांनी कम्प्युटर सायन्समध्ये अलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतली. २००३ मध्ये गणितात चांगले गुण मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांना कॉलेज सोडावे लागले. २०१५ मध्ये सुशील यांनी पॉलिटेक्निक केलं. त्यानंतर त्यांनी एंट्री लेवल टेलीकॉलर आणि सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून कंपनीत काम केलं. त्यावेळी त्यांचा पगार ११ हजार रुपये होता.
एसएसआर टेकव्हीजनची स्थापना?
सुशील यांनी २०१३ मध्ये सरिता रावत यांच्याशी भेट झाली. त्यावेळी ते साफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होते. दोघांनी लग्न केलं. दोघांनी मिळून यूएस बेस्ड बिजनेस कंपनी नोएडामध्ये कार्यालय सुरू केलं. त्यांचा दुसरा व्यवसाय आहे डिबाको.
डिबाको हे ग्लोबल बी २ सी कपड्यांचा ऑनलाईन स्टोर आहे. त्यांची पत्नी सरिता या कंपनीचं काम पाहते. २०१९ मध्ये त्यांनी तिसरा व्यवसाय सुरू केला. ही एक मल्टिनॅशन आयटी कंपनी आहे. आयटी कंपन्यांना योग्य उमेदवार निवडीसाठी प्रयत्न करते. अमेरिका आणि भारतात रोजगार उपलब्ध करून देणारी कंपनी आहे.