ड्युक ऑफ कनॉटने केले होते जुन्या संसदेचे लोकार्पण, कोण होते कनॉट?
पदवीचे शिक्षण घेत असताना ब्रिटिश सेनेत लेफ्टनंट झाले. त्याचवेळी त्यांना ड्युक बनवण्यात आले. ड्युक ही ब्रिटिशकाळातील एक पदवी आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्धाटन करणार आहेत. संसदेची जुनी इमारत इतिहास म्हणून राहील. जुन्या संसदेचे संग्रहालय तयार करू शकतात. ब्रिटिश काळात संसदेची जुनी इमारत तयार झाली. देशासाठी कितीतरी ऐतिहासिक निर्णय या संसदेत झाले. स्वतंत्र देशाची पहिली लोकसभा एप्रिल १९५२ ला स्थापन झाली. लोकसभेची पहिली बैठक मे १९५२ रोजी आयोजित करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत ही इमारत १७ लोकसभांची साक्षीदार ठरली. परंतु, या संसदेचा इतिहास स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे. जुन्या संसदेचे लोकार्पण १९२१ साली ड्यूक ऑफ कनॉट म्हणजे प्रिन्स ऑर्थर यांनी केले होते. त्याचे उद्धाटन ६ वर्षांनंतर १९२७ साली झाले.
कोण होते ड्युक ऑफ कनॉट
जुन्या संसदेचे लोकार्पण करणारे ड्यूक ऑफ कनॉट युकेची महाराणी व्हिक्टोरीया यांचे सातवे रत्न आणि तिसरे पुत्र होते. त्यांचे नाव होते प्रिंस ऑर्थर. ते १६ वर्षांचे असताना रॉयल मिलिटरी अकादमीत सहभागी झाले. पदवीचे शिक्षण घेत असताना ब्रिटिश सेनेत लेफ्टनंट झाले. त्याचवेळी त्यांना ड्युक बनवण्यात आले. ड्युक ही ब्रिटिशकाळातील एक पदवी आहे. लॅटीन भाषेत dux पासून हा शब्द तयार झाला आहे. याचा अर्थ जनरल असा होतो.
संसद भवनाचे निर्मिती प्रशासन भवन म्हणून करण्यात आली होती. ब्रिटीश शासन काळात १९११ ला राजधानी कोलकातावरून दिल्लीला स्थानांतरित करण्यात आली. नवीन शहराची स्थापना करण्यात आली. तेव्हा प्रशासन चालवण्यासाठी या संसद भवनची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर हे केंद्र देशाचे महत्त्वाचे केंद्र झाले.
हे होते आर्किटेक्ट
या इमारतीची जबाबदारी आर्किटेक्ट एडवीन लुटियंस आणि हर्बर्ट बेकर यांना दिली होती. या दोघांना फक्त भवन निर्माण करायचा नव्हता, तर डिझाईन तयार करायचे होते. बंगालचे व्हाईसराय, नॉर्थ ब्लाक, साऊथ ब्लाक आणि आजूबाजूच्या प्रमुखांना आर्किटेक्ससोबत संसदेचे डिझाईन केले. यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला.
१९२१ साली प्रशासनिक भवनाचे लोकार्पण झाले. त्यासाठी ड्युक ऑफ कनॉट म्हणजे प्रिंस ऑर्थर यांची निवड करण्यात आली. त्यावेळी ते भारत यात्रेवर आले होते. त्यापूर्वी ते कनाडाचे गव्हर्नर राहिले होते. ड्यूक ऑफ कनॉटच्या नावारून दिल्लीत कनॉट प्लेस नाव पडले होते. १८ जानेवारी १९२७ रोजी या भवनाचे बांधकाम झाले. तेव्हा याचे उद्घाटन तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड इरवीन यांनी केले.