जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, 18 टन सोनं उंटावरुन मक्केला नेले होते
सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान इलॉन मस्क यांच्याकडून पुन्हा ॲमाझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याकडे गेला आहे. परंतू तुम्ही इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची कहाणी कधी ऐकली आहे का?
रियाद | 7 मार्च 2024 : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पुन्हा एकदा ॲमाझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे पहिल्या क्रमाकांवर आला आहे. 200 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह बेझोस यांनी इलॉन मस्क ( 198 अब्ज डॉलर ) यांना मागे टाकले आहे. परंतू तुम्हाला एका व्यक्तीची संपत्ती आजच्या धनदांडग्यांहून अधिक होती हे माहीती आहे काय? 14 व्या शतकात आफ्रीका खंडात शासन करणारा मनसा मूसा आतापर्यंतचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
1280 मध्ये जन्मलेले मनसा मूसा यांनी इसवी सन 1312 मध्ये पश्चिम आफ्रीकेच्या विशाल माली साम्राज्यावर राज्य केले होते. मूसा यांच्या जवळ इतकी संपत्ती होती ही आजच्या तुलनेत ती 400 अब्ज डॉलर भरते. मूसाची संपत्ती आजच्या धनकुबेरांच्या कित्येक पट जास्त होती. मुसाच्या राज्यात नैसर्गिक साधन संपत्ती सर्वाधिक होती. मालीतील बंबूक, वंगारा, ब्युर, गलाम आणि तगाजा येथील खाणीतून सोन्याचा पुरवठा व्हायचा.टिम्बकटू येथून राज्य करणाऱ्या मूसाचे राज्य आयव्हरी कोस्ट, सेनेगल, माली आणि बुर्कीना फासोसह अनेक आफ्रीकन समकालीन देशात पसरले होते.
सोने दान करायचे
मूसा हे बुद्धीमान आणि प्रचंड दानशूर होते. मालीत त्यांच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात, त्यांच्याकडे मागण्यासाठी कोणी आला तर त्याला ते सोन्याने मढवून टाकायचे. स्थानिक इतिहासकारांनी त्यांना उधळपट्टी करणारा बादशाह देखील म्हटले आहे. लंडनच्या स्कूल ऑफ आफ्रीकन एंड ओरिएंटल स्टडीजच्या ल्युसी ड्यूरन यास मूसा यांचे औदार्य म्हणतात.
हज यात्रेने इतिहासात नोंद
1324 मध्ये मूसा यांनी मक्काला जाण्यासाठी प्रवास सुरु केला. त्यांना ताफा इतका मोठा होता की त्यात 100 ऊंट, 12000 नोकर आणि 60 हजार गुलाम सोबत होते, सहारा वाळवंटाला पार करणारा त्यांचा पहिला दौरा होता. त्यांना ऊंटावर 18 टन सोने लादले होते. याची किंमत एक अब्ज डॉलर असावी.