Single Railway Station : निसर्गाची मुक्तउधळण असलेल्या या राज्यात आहे केवळ एकच रेल्वेस्टेशन! आला त्याच ट्रॅकवरुन जावे लागते परत
Single Railway Station : निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या या राज्यात केवळ एकच रेल्वे स्टेशन आहे, हे ऐकून तुम्ही कदाचित विश्वास ठेवणार नाहीत. पण पूर्वोत्तरातील या राज्यात केवळ एकच रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे येथे रस्ते हेच या राज्याची लाईफलाईन आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) हे आशियातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानल्या जाते. भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाईन म्हणतात. कोट्यवधी प्रवाशी दररोज रेल्वेने भारतभर प्रवास करतात. काही जण तर एका शहरातून दुसऱ्या शहरात नोकरीनिमित्तही दररोज प्रवास करतात. प्रवासासाठी भारतीय रेल्वे स्वस्त आणि किफायतशीर साधन मानण्यात येते. रेल्वेमुळे एका टोकाहून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी स्वस्तात प्रवास करता येतो. देशात रेल्वेचेही मोठे जाळे आहे. पण पूर्वेत्तरमधील एका राज्यात केवळ एकच रेल्वे स्टेशन (Single Railway Station) आहे. या राज्यावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. पण प्रवाशांसाठी येथील प्रवास खडतर आहे. रस्त्याशिवाय येथील लोकांना पर्याय नाही.
भारतीय रेल्वे हे विशाल नेटवर्क आहे. जवळपास 8 हजार रेल्वे स्टेशनचे मोठे नेटवर्क आहे. परंतु, मिझोरम या पूर्वोत्तर राज्यात केवळे एकच रेल्वेस्टेशन आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मिझोरमची लोकसंख्या 11 लाखांच्या घरात आहे. तरीही या राज्यात एकच रेल्वे स्टेशन आहे. बइराबी असे या रेल्वे स्टेशनचे नाव आहे. याठिकाणीच या राज्यातील रेल्वेचा प्रवास संपतो. तुमच्या यात्रेला विराम मिळतो. या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसोबतच मालवाहतूकही करण्यात येते. म्हणजे प्रवाशांची आणि मालवाहतूकीचे हे शेवटचे स्टेशन आहे.
बईराबी स्टेशन हे मिझोरम राज्यातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे. या नंतर पुढे राज्यात कुठेही स्वतंत्र रेल्वे स्टेशन नाही. 11 लाख लोकसंख्या असणाऱ्या या राज्यात केवळ एकच रेल्वे स्टेशन असल्याने जनतेला प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागत असेल हे तर उघडच आहे. त्यामुळे या रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते. भारताशी स्वस्तात प्रवासाचे एकमेव साधन असल्याने रेल्वेत प्रचंड गर्दी असते. सर्व राज्यभरातून लोक या रेल्वेस्टेशनला येतात. तर प्रवाशांनाही मिझोरममध्ये पर्यटनासाठी येण्यासाठी याच रेल्वेचा आधार घ्यावा लागतो.
या रेल्वे स्टेशनवर 3 प्लेटफॉर्म आहेत. पण सोयी-सुविधांचा प्रचंड अभाव आहे. या रेल्वे स्टेशनवर मुलभूत सोयी-सुविधा पण नाहीत. तुम्हाला असे वाटत असेल की राज्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असल्याने येथे आधुनिक सुविधा मिळतील, तर हा भ्रम तिथे गेल्यावर दूर होतो. पण येथील निसर्ग सौंदर्यापुढे प्रवाशी याकडे दूर्लक्ष करतात. या रेल्वे स्टेशनचा कोड BHRB असा आहे. या रेल्वे स्टेशनवर चार ट्रॅक आहेत. या रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचे काम संथगतीने सुरु आहे. 2016 मध्ये रेल्वे स्टेशनमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. पूर्वी हे स्टेशन अत्यंत छोटे होते. आता त्याचा विस्तार झाला आहे.
बइराबी रेल्वे स्टेशनपासून 84 किलोमीटरवर कथाकल जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. त्याच्याशी हे रेल्वे स्टेशन जोडलेले आहे. या रेल्वे स्टेशनचा 2 किलोमीटरचाच भाग मिझोरम राज्यात आहे. या रेल्वे स्टेशनसह इतर रेल्वे स्टेशन सुरु करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पण सध्या एकमेव हेच रेल्वे स्टेशन आहे.