मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे तीन जणांचा मृत्यू; हा बॅक्टेरिया किती घातक?

अर्धकच्चे मांस खाल्यामुळे याचा संसर्ग होऊ शकतो. एखाद्या खुल्या जखमेसोबत स्विमिंग पूलमध्ये पाण्याच्या संपर्कात आल्याने संसर्ग होऊ शकतो.

मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे तीन जणांचा मृत्यू; हा बॅक्टेरिया किती घातक?
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 6:52 PM

Flesh Eating Bacteria: आता मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाचा धोका वाढला आहे. एका देशात आतापर्यंत तीन जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या घटना न्यूयार्क आणि त्याच्याशी शेजारी असलेल्या परिसरात घडल्या. वैद्यकीय अधिकारी क्रिस्टोफर बॉयल म्हणतात, मांस खाणेवाल्या बॅक्टेरियाने विब्रियो वल्मिफिकलसमुळे कनेक्टीकटमध्ये दोघांचा मृत्यू झाला. स्विमींग पुलमध्ये आंघोळ केल्यामुळे बॅक्टिरेयाचा संसर्ग झाला. तिसऱ्या घटनेत, सीफूडमध्ये जेवण केल्यानंतर संसर्ग झाला. मृतकांचे वय ६० ते ८० वर्षे सांगण्यात आलंय. न्यूयार्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या बॅक्टेरिया न्यूयार्कमध्ये वाढला की आणखी कुठं याचा शोध सुरू करण्यात आला आहे. कसा असतो हा मांस खाणारा बॅक्टेरिया आणि त्याचा संसर्ग कसा होतो.

कसा होतो संसर्ग ?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीननुसार, लॅटीन भाषेत विब्रियोचा अर्थ बाईब्रेट म्हणजे घाव करणारा असा होतो. अर्धकच्चे मांस खाल्यामुळे याचा संसर्ग होऊ शकतो. एखाद्या खुल्या जखमेसोबत स्विमिंग पूलमध्ये पाण्याच्या संपर्कात आल्याने संसर्ग होऊ शकतो.

जर्नल ऑफ अमेरिकन एसोसिएशननुसार, विब्रियो बॅक्टेरियाचा संसर्ग दूषित खाणे-पिणे आणि मोकळ्या जखमेच्या माध्यमातून होऊ शकतो. अशा घटना मे ते ऑक्टोबरच्या दरम्यान होतात. कारण अशावेळी पाण्यात थोडी उष्णता असते.

बॅक्टेरिया किती धोकादायक?

या बॅक्टेरियाचा संपर्क धोकादायक समजला जातो. संसर्ग झाल्यास ताबाडतोब उपचाराची गरज असते. हा बॅक्टेरिया शरीराच्या भागासाठी धोकादायक असतो. याच्या संसर्गामुळे पाचपैकी एक व्यक्तीचा मृ्त्यू होतो.

तज्ज्ञ म्हणतात, खुल्या जखमीमुळे संबंधित भागात संसर्ग पसरतो. त्यामुळे याला मांस खाणारा बॅक्टेरिया म्हणून ओळखले जाते. अमेरिकन हेल्थ एजन्सी सीडीसीनुसार, याचा संसर्ग झाल्यास डायरिया, उलटी होणे, ताप येणे, थरथर कापणे अशी लक्षणे दिसतात. संसर्गाच्या २४ तासानंतर अशी लक्षणं दिसतात. संसर्ग झाल्यास जखम तीन दिवस त्रास देते. व्यक्तीचा बचाव करणारी रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

रुग्णास संसर्ग झाला की नाही, हे रक्त तपासणीतून स्पष्ट केले जाते. जखमेवरील भागातील सॅम्पलनेही याची माहिती होते. संसर्ग झाल्यास जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच रुग्णास एंटीबायोटिक्स दिले जाते. अशी प्रकरणं २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये समोर आलीत. तापमान वाढल्यानंतर असे प्रकार समोर येतात.

अशी घ्या काळजी

न्यूयॉर्कमध्ये अलर्ट मोड जारी करण्यात आले आहे. लोकांमध्ये जागृती केली जात आहे. खुल्या जखमीसह पाण्यात जास्त वेळ राहू नका. विशेषतः समुद्राच्या पाण्यात. कच्चे आणि अर्धकच्चे सीफूड खाऊ नका.

Non Stop LIVE Update
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.