Wealth Creation: श्रीमंत व्हायचंय? तर मग जाणून घ्या संपत्ती तयार करण्याचं सूत्र !
संपत्तीची निर्मिती ही अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. भविष्यातील तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसे हवे असतात, ज्यात घर खरेदीपासून ते मुलांचं शिक्षण, लग्नाचा खर्च काहीही असू शकतं. शिवाय नोकरी गमावण्याच्या काळात, वा इतर कुठलंही मोठं नुकसान झालंस, तुम्हाला एका मार्गाने उत्पन्न सुरु राहतं, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्य सुरक्षित करण्यासाठी होतो. हेच नाहीतर आयुष्याच्या उतरत्या काळात, निवृत्तीनंतरचा टप्पा हा अवघड असतो. या काळात तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असतं, त्यात दवाखान्याचा खर्च, दैनंदिन खर्च भागवण्यासाठी नियमित उत्पन्न गरजेचंच आहे.
मुंबई : (Wealth Creation) श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, म्हणूनच माणूस दिवसरात्र मेहनत करतो. भरपूर पैसा, बँक बॅलन्स, रिअल इस्टेट, कार आणि बंगले कोणाला नको असतात? या सर्व गोष्टी एका रात्रीत उभ्या राहत नाहीत, अधिकाधिक पैसा मिळवूनही संपत्ती तयार होत नाही. संपत्ती उभी करण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. याबरोबर (Proper planning) योग्य नियोजनाची तेवढेच महत्वाचे आहे. अल्पावधीत हे शक्य नसले तरी योग्य नियोजनातूनच साध्य होणार आहे. (Investment) गुंतवणुकीचा फायदा अल्पावधीतच नाहीतर त्यासाठी योग्य दिशा असणेही गरजेचे आहे.
संपत्ती वाढवतात तरी कशी?
केवळ पुरेसा पैसा मिळवून संपत्ती निर्माण करता येत नाही. यासाठी तुम्हाला तुमची बचत योग्य प्रकारे गुंतवावी लागते, जेणेकरुन त्यातून तुम्हाला दीर्घकाळ पैसा मिळत राहतो. पैसा पैशाला खेचतो म्हणतात, त्यातूनच संपत्तीची निर्मिती होते. याशिवाय तुमचं आर्थिक ध्येयही तुम्हाला ठरवावं लागतं, म्हणजेत त्यातून मिळालेला पैसा तुम्हाला कधी हवा आहे, त्याचंही गणित तुम्हाला ठरवावं लागतं. फक्त योग्य गुंतवणूक करणंच महत्त्वाचं नाही तर ती गुंतवणूक चांगले रिटर्न देण्यासाठी तिला पुरेसा वेळ देणंही तितकंच गरजेचं आहे. चक्रवाढीचा फायदा हा दीर्घकालीन गुंतवणुकीलाच मिळतो. त्यामुळे तुम्ही आतापासून जितक्या लवकर गुंतवणूक कराल, तितका तुम्हाला त्यातून जास्त रिर्टन्स मिळतील, मात्र असं करण्यात जोखिमही असते, त्यामुळे त्याचीही काळजी तुम्ही घ्या. कुठलीही गुंतवणूक करण्याआधी त्यातील जोखीम काय हेही जाणून घ्या, त्यामुळे तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
संपत्ती निर्माण करणं महत्त्वाचे का आहे?
संपत्तीची निर्मिती ही अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. भविष्यातील तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसे हवे असतात, ज्यात घर खरेदीपासून ते मुलांचं शिक्षण, लग्नाचा खर्च काहीही असू शकतं. शिवाय नोकरी गमावण्याच्या काळात, वा इतर कुठलंही मोठं नुकसान झालंस, तुम्हाला एका मार्गाने उत्पन्न सुरु राहतं, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्य सुरक्षित करण्यासाठी होतो. हेच नाहीतर आयुष्याच्या उतरत्या काळात, निवृत्तीनंतरचा टप्पा हा अवघड असतो. या काळात तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असतं, त्यात दवाखान्याचा खर्च, दैनंदिन खर्च भागवण्यासाठी नियमित उत्पन्न गरजेचंच आहे. त्यामुळे या काळात पैशाची कमतरता जाणवू नये, म्हणून आजपासूनच गुंतवणूक करणं फायद्याचं आहे. ज्यामुळे तुम्ही कुणावरही ओझं बनून राहत नाही, आणि स्वातंत्र्यानेच आयुष्याचे शेवटचे दिवस काढू शकता. संपत्ती कशी वाढवायची, बचत कशी करायची याबद्दल अधिकही माहिती जाणून घेण्यासाठी 5paisa.com ला भेट द्या जिथे अनुभवी फंड व्यवस्थापक तुम्हाला तुमची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतील.