UPI पासून NEFT पर्यंत पेमेंट करण्याचे पाच प्रकार कोणते ? कशाला शुल्क लागते पाहा ?

डिजिटल पेमेंटचे देशातील प्रमाण मोठे आहे. साधा रस्त्यावरील फेरीवाल्याकडे देखील क्युआर कोडने युपीआय पेमेंट करण्याची सोय आलेली आहे. 'यूपीआय'ने केलेले आर्थिक व्यवहार यंदा पहिल्या सहामाहीतच 116.63 लाख कोटी रुपयांवर गेले आहेत...

UPI पासून NEFT पर्यंत पेमेंट करण्याचे पाच प्रकार कोणते ? कशाला शुल्क लागते पाहा ?
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 2:56 PM

डिजिटल इंडिया मोहीमेंतर्गत आता आर्थिक व्यवहार ऑनलाईन होत चालले आहेत. कोणालाही रोकड बाळगण्याची गरज राहीलेली नाही. त्यामुळे कोणालाही पेमेंटसाठी आता क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड,  युपीआय,  मोबाईल वॉलेट, NEFT ( National Electronic Funds Transfer), RTGS ( Real Time Gross Settlement ), IMPS Immediate Payment Service सारख्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आर्थिक व्यवहार केले जात आहेत. डिजिटल आर्थिक व्यवहाराने पैशांची देवाण घेवाण सोपी झालेली आहे. तर पाहूयात UPI पासून NEFT पर्यंत पेमेंट करण्याचे पाच प्रकार कोणते आहेत ते पाहुयात….

UPI 

भारतात युपीआय सुविधेला सध्या सर्वात पसंत केले जात आहे. या व्यवहाराची खासियत म्हणजे हा व्यवहार सुट्टीच्या काळातही दिवसाचे 24 तास करता येतो. Google Pay, PhonePe आणि Paytm सारखे UPI सारखे प्लॅटफॉर्म वापरुन काही सेंकदात पेमेंट करता येते. याची एक खासियत म्हणजे यात बहुतांश व्यवहारावर कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. अशात वीजबिल भरण्यापासून ते किराणा सामान खरेदी करण्यापर्यंतचे व्यवहार युपीआयने झट की पट होत आहेत.

हे सुद्धा वाचा

क्रेडिट लाईन 

गेल्या शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने छोट्या वित्तीय बँकांना ( Small Finance Bank ) युपीआयच्याद्वारे कर्ज देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठीचे गाईडलाईन लवकरच जारी करण्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण क्षेत्रातही छोट्या व्यापाऱ्यांना सहज लोन उपलब्ध केले जाणार आहे.त्यामुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार आहे, रोजगार वाढणार असून ग्रामीण भागाचा विकास होणार आहे.आधी युपीआयवर कर्ज देण्याची परवानगी काही मोजक्या वाणिज्यिक बँकांनाच होती.

NEFT

भारतात आरबीआयद्वारे संचालित इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहार प्रणाली NEFT मुळे ( National Electronic Funds Transfer ) स्थानिक पातळीवर बँक खात्यांच्या दरम्यान पैशांचे व्यवहार खूपच सहज होत आहेत. परंतू यात पैशांचे अदान प्रदान करण्यासाठी ठराविक काळ लागतो.

NEFT मध्ये युपीआयच्या तुलनेत पेमेंट होण्यासाठी काही वेळ लागतो. परंतू NEFT विश्वसनीयता आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची पद्धत आहे.यासाठी युपीआय सारखे स्मार्टफोनची गरजही लागत नाही. उलट इंटरनेट बँकींग किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन आपण NEFT करु शकतो. पैशाचे अदान-प्रदान करण्याचा हा सर्वात जुनी पद्धत आहे. ज्यांना जास्त मोबाईल वापरता येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत विश्वासार्ह आहे.

RTGS

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी या पद्धतीत एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. या पद्धतीच्या पैसे पाठविण्याच्या पद्धतीसाठी शुल्क आकारले जाते. RTGS तून खात्यात पैसे येताच प्रोसिजर सुरु होते.त्यामुळे खाते धारकाला लागलीच पैसे मिळतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.