बूट आणि चप्पल उलट्या का ठेवू नयेत? जाणून घ्या या मागील रंजक कारण
आपल्या घराच्या दाराबाहेर जेव्हा चप्पल आणि बुट काढतो आणि त्या वेळेस जेव्हा एखादी चप्पल उलटी पडलेली दिसते तेव्हा प्लाइया घरातील आई व आजी लगेच आपल्याला सांगता चप्पल सरळ करायला. पण तुम्ही कधी या] गोष्टीचा विचार केला आहे का उलटी पडलेली चप्पल सरळ करायला का सांगता?
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा घराच्या आत किंवा बाहेर बूट-चप्पल उलटे पडलेले असतात, तेव्हा घरातील मोठी लोकं आपल्याला त्या चप्पला ताबडतोब सरळ करण्यास सांगतात. त्यात खरं तर आपल्या आजीला उलटे बूट-चप्पल दिसले तर ती लगेच सरळ करायला सांगते. कधी कधी ती सविस्तर उत्तर देत नाही आणि फक्त बूट-चप्पल उलटी करू नये एवढंच म्हणते, हे अशुभ आहे. पण आपण कधी विचार केला आहे का की आपले वडीलधारे माणसं असे का म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर वास्तुशास्त्रात दडलेले आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला चप्पल आणि शूज उलटे न ठेवण्याच्या या रहस्याची माहिती देत आहोत.
धार्मिक दृष्टीकोनातून पहा
आपल्या धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की बूट आणि चप्पल उलट्या ठेवल्याने घरात नकारात्मकता आणि दुर्दैव येते. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह विस्कळीत होतो. त्याचबरोबर या अश्या गोष्टींबद्दलच्या अनादराचे प्रतीकही मानले जाते. वास्तुनुसार उलटे शूज आणि चप्पल दाराबाहेर पडलेले असतील तर यामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे लक्ष्मीदेवी देखील नाराज होते, ज्यामुळे घरात आर्थिक समस्या आणि आजारांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
धार्मिक मान्यता
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, वास्तुशास्त्रानुसार शनिदेवाला पायांचा कारक मानले जाते. त्यामुळे आपल्या दाराबाहेर किंवा इतर ठिकाणी जर चप्पल उलटी पडून राहिल्यास शनिदेव रागावतात. असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी देवीचा अपमान होतो, ज्यामुळे आपल्या घरात अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात. अशा वेळी तुम्हला दाराबाहेर उलट्या चप्पल दिसल्यास ताबडतोब सरळ कराव्यात.
बूट आणि चप्पल संबंधित इतर वास्तु टिप्स
वास्तुनुसार बूट आणि चप्पल उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवू नयेत. असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते कारण या दिशा लक्ष्मीदेवीच्या असल्याचे मानले जाते. याच कारणामुळे या दिशांना बूट आणि चप्पल ठेवल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.
त्याच बरोबर घराबाहेर बंद कॅबिनेट आणि रॅकमध्ये बूट चप्पल ठेवाव्यात. कारण बंद कॅबिनेट नकारात्मकता पसरण्यापासून रोखतात.
तुम्ही जेव्हा बाहेरून येतात तेव्हा दारात बूट आणि चप्पल काढणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात.