Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘1 यूनिट’ म्हणजे नक्की किती वीज? जाणून घ्या तुमच्या घरचे बिल कसे तयार होतं!

वीजबिल हातात पडतं, पण खरंच कळतं का ते कसं बनतं? '1 यूनिट' म्हणजे नेमकं काय, आणि कोणती वस्तू किती वीज खाते? याच्यामागे आहे एक सोपं पण महत्त्वाचं गणित! चला, जाणून घेऊया तुमच्या प्रत्येक यूनिट मागचं गुपित आणि बचतीचा मार्ग!

'1 यूनिट' म्हणजे नक्की किती वीज? जाणून घ्या तुमच्या घरचे बिल कसे तयार होतं!
वीज बील
Follow us
| Updated on: Apr 10, 2025 | 3:48 PM

आजच्या डिजिटल युगात वीज ही आपल्या दैनंदिन गरजांपैकी एक झाली आहे. मोबाईलपासून ते टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, लॅपटॉपपर्यंत सगळंच वीजेवर चालतं. त्यामुळे प्रत्येक महिन्याला येणारं वीजबिलही आपोआपच आपल्या बजेटचा महत्त्वाचा भाग बनलं आहे. पण अजूनही अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो “हे ‘1 यूनिट’ म्हणजे नक्की काय?”

‘1 यूनिट’ म्हणजे काय?

‘1 यूनिट वीज’ म्हणजे 1 किलोवॅट तास (1 kWh). याचा अर्थ – जर एखादं उपकरण 1000 वॅट्स (1 किलोवॅट) वीज वापरत असेल आणि ते तुम्ही 1 तास चालवलं, तर त्याने 1 यूनिट वीज खर्च केली.

उदाहरणार्थ : जर तुमचं इलेक्ट्रिक गीझर 2000 वॅट्सचं असेल आणि ते तुम्ही अर्धा तास वापरलं, तर तुमच्या मीटरवर 1 यूनिट वापर नोंदवला जाईल.

टीव्ही, जो सुमारे 100 वॅट वापरतो, तो जर तुम्ही 10 तास चालवला, तरी त्याने फक्त 1 यूनिट वीज खर्च होईल.

तुमच्या वीजबिलाचं गणित काय?

वीज मीटरवरून युनिट्सची संख्या कळते आणि त्यावरूनच तुमचं बिल ठरतं. समजा, तुमचं मासिक युनिट वापर 200 युनिट्स आहे आणि दर युनिटचा दर ₹6 आहे, तर…

200 युनिट x ₹6 = ₹1200

पण हे फक्त युनिट वापराचं गणित आहे, याव्यतिरिक्त अजून काही गोष्टी बिलात जोडल्या जातात…

बिलात अजून काय समाविष्ट असतं?

फिक्स्ड चार्ज: दर महिन्याचा एक ठराविक शुल्क (मीटर प्रकारावर अवलंबून)

टॅक्सेस: सरकारकडून लावलेले विविध कर

टॅरिफ स्लॅब: उदाहरणार्थ, पहिल्या 100 युनिटसाठी दर ₹5 असेल, पुढच्या 100 युनिटसाठी ₹6.50 वगैरे.

पॉवर फॅक्टर/सेवा शुल्क: काही राज्यांमध्ये वेगळ्या सुविधा शुल्कांचाही समावेश असतो.

या सगळ्या गोष्टी मिळून तुमचं फायनल वीजबिल तयार केलं जातं.

वापर समजून घ्या – बचत करा!

तुम्हाला जर वीजबिल कमी करायचं असेल, तर सर्वप्रथम तुमचं मीटर आणि युनिट वापर समजून घ्या. घरातील कोणतं उपकरण किती वीज घेतंय, हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार वापर कमी केल्यास महिन्याच्या शेवटी बचतही होईल.

थोडक्यात काय?

‘1 युनिट वीज’ म्हणजे वीजेचं एक मोजमाप – जे संपूर्ण बिलाचं गणित बदलू शकतं. हे नीट समजलं, की वीज वापराचं नियोजन करणं सोपं जातं, आणि तुमच्या खिशालाही आराम मिळतो!

'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका.