जगात ‘मोसाद’ची दहशत का ? कसे चालते या संघटनेचे नेटवर्क

इस्रायलच्या मोसाद गुप्तहेर संघटनेने यापूर्वी इराणमध्ये अनेक हत्या आणि गुप्तचर कारवाया केल्या आहेत. मोसादच्या कारवाया या एखाद्या थ्रिलर स्पाय कांदबरीसारख्या वाचल्या जातात. त्यावर अनेक चित्रपट देखील आलेले आहेत.

जगात 'मोसाद'ची दहशत का ? कसे चालते या संघटनेचे नेटवर्क
mossad
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 12:10 AM

हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानियाची इराणची राजधानी तेहरान येथे हत्या झाल्याने पश्चिम आशियात युद्ध भडकणार की काय अशी शंका व्यक्त होत आहे. हमासचा प्रमुख इस्माइलची इराणमध्येच हत्या घडवून मागे पडलेल्या इस्रायलने या मानसिक युद्धात आघाडी घेतली आहे. या हल्ल्याची सूत्रे इस्रायलची गुप्तहेर संघटना ‘मोसाद’कडे होते असा संशय इराणला आहे. हानिया हा मुळचा मवाळ गटाचे प्रतिनिधीत्व करणारा होता असे म्हटले जाते. आपल्या मागे ‘मोसाद’ आहे हे देखील त्याला माहिती होते. हल्ला होणार आहे म्हणूनच 2019 मध्ये हानियाने कतारमध्ये आश्रय घेतला होता. परदेशी भूमीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी मोसाद कधी घेत नाही. इराण आणि इस्रायल यांच्यात आता संघर्ष पेटणार असे म्हटले जात आहे. परंतू ‘मोसाद’ ही संघटना नेमकी काय आहे ? ती कसे काम करते ते पाहूयात…

इस्रायल या छोट्याशा देशाची ‘मोसाद’ ही गुप्तहेर संघटना अमेरिकेच्या ‘सीआयए’ नंतर जगात सर्वात खतरनाक गुप्तहेर संघटना मानली जाते. मोसाद आपले ‘लक्ष्य’ कधीच चुकवत नाही. कारण मोसाद संघटनेचे एजंट आपले टार्गेट किंवा सावज हेरण्यापूर्वी त्याचा संपूर्ण अभ्यास करतात. मिशन पूर्ण झाल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा अंदाज आधीच बांधून ‘मोसाद’ पडेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवूनच मिशन हातात घेते.

हमासाचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया याची हत्या बुधवारी 31 जुलैच्या सकाळी इराणची राजधानी तेहरान येथे राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या निवासस्थानात बॉम्बस्फोट घडवून करण्यात आली होती.  इराणचे निमलष्करी दल इराण रिवोल्युशनरी गार्ड्स कोर ( आयआरजीसी ) या हत्येला दुजारा दिला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. त्यामुळे इस्रायलच्या मोसादनेच हा हल्ला केल्याचा संशय इराणला आहे.

किलींग मशिनप्रमाणे काम

मोसाद या गुप्तहेर संघटनेचा धसका जगातील अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांनी घेतलेला आहे. अमेरिका, ब्रिटन, भारत, पाकिस्तान आणि रशियापासून ते चीनपर्यंत अनेक देशाच्या गुप्तहेर संघटना आहेत. या सर्व संघटना ताकदवान आणि मोठ्या आहेत. त्यांचे हेर जगभर पसलेले आहेत. परंतू तरीही मोसादची दहशत काही औरच आहे. या संघटनात मोसादला वरचा दर्जा आहे. कारण या संघटनेचे एजंट शत्रूला टिपण्यासाठी कोणतेही धाडस करायला सज्ज असतात. इस्रालयच्या शत्रूंना टिपण्यासाठी ही संघटना किलींग मशिनप्रमाणे काम करते.

जागतिक पातळीवर मोसाद संघटनेने अनेक ऑपरेशन्स केलेले आहे. त्यामुळे कोणत्याही त्रयस्त देशात देखील मोसाद यशस्वीपणे हल्ला करुन शत्रूला अक्षरश: वेचून वेचून मारण्यासाठी ओळखली जाते. कारण अशा परक्या मुलखात अशा मोहीमा तडीस नेणे धोकादायक असते. प्रसंगी युद्ध देखील होऊ शकते. परंतू कोणतीही जोखीम ही संघटना घेते. मोसाद ह्युमन इंटेलिजन्स आणि सिग्नल इंटेलिजन्सचा अशा अनेक पद्धतीचा वापर करुन शत्रूचा नायनाट करते.

मोसाद काय आहे ?

इस्रायलच्या तीन प्रमुख संघटना आहेत. मोसाद ही ( हिब्रू : सेंट्रल इंस्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स ) इस्रायलच्या तीन प्रमुख गुप्तचर संस्थांपैकी एक आहे. अमन, शिन बेट आणि मोसाद अशी त्यांची नावे आहेत. अमन ( लष्करी गुप्तचर शाखा ) आणि शिन बेट ( अंतर्गत सुरक्षा शाखा  )  आणि मोसाद परदेशात गुप्त माहिती गोळा करते, गुप्त माहितीचे विश्लेषण आणि गुप्त ऑपरेशन्सशी संबंधित कामे करीत असते. मोसादची दोन स्वतंत्र काऊंटर टेररिझम युनिट्स आहेत. पहिल्या युनिटचे नाव मेटसाडा असून ती शत्रूवर हल्ला करते. दुसरी किडोन युनिट असून हीचे काम गुप्तपणे चालते. परंतू किडोन युनिट्स मुख्यत: अतिरेक्यांचा खातमा करते. मेटसाडाची देखील स्वतंत्र युनिट्स आहेत.

मोसादची स्थापना कधी झाली

मोसाद गुप्तहेर संघटनेची स्थापना इस्रायलमध्ये 13 डिसेंबर, 1949 मध्ये झाली होती. इस्रायल सरकारने मोसादची स्थापना खास दहशतवाद्यांशी लढण्यासाठीच केली होती. नंतर 1951 मध्ये मोसादला इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडे सोपविण्यात आले. ही संघटना थेट  इस्रायलच्या पंतप्रधानांना रिपोर्ट करते. रियूवेन शिलोआ हे मोसादचे पहिले संचालक म्हणून निवडले गेले होते. शिलोआ हे 1952 मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर इस्सर हारेल हे मोसादचे संचालक झाले. हारेल यांनी आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात या संघटनेला क्रूर आणि अतिरेक्यांची किलींग मशिन म्हणून तिचे रुपांतरण केले. आजच्या काळात मोसादजवळ टॉप क्लास सिक्रेट एजंट आहेत. हायटेक इंटेलिजन्स टीम, शार्प शूटर आणि विषकन्या सौदर्यवतींसह अनेक गुप्तहेर आणि समर्पित गुप्त योद्ध्यांची फौज आहे. मोसादचे हेर इतक्या सफाईने एखाद्या मोहिमेला तडीस नेतात की कोणताही पुरावा मागे शिल्लक ठेवत नाहीत.  ‘मोसाद’ इस्रायल आणि ज्यूंच्या रक्षणासाठी सक्रीय असून अन्य देशांच्या गुप्तहेर संघटनाशी गुप्तपद्धतीने संबंध विकसित करीत आहे. इस्रायलशी उघडपणे समर्थन न देणाऱ्या देशांशी देखील मोसादने गुप्त संबंध प्रस्थापित केलेले आहेत.

डेव्हिड ‘दादी’ बर्निया यांनी जून 2021 मध्ये योसी कोहेन यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. मोसादच्या प्रमुखांना एक तर लष्करी सेवेतून किंवा गुप्तचर सेवेतून निवडले जाते.  बर्निया यांच्या आधी मोसादमध्ये सेवा केलेल्या 12 संचालकांपैकी सात गुप्तचर विभाग सेवेतील अधिकारी होते आणि पाच माजी लष्करी अधिकारी होते. तर काहींनी दोन्ही सेवेत काम केलेले होते.

बर्निया हे 1983 मध्ये IDF ( Israel Defense Forces )  मध्ये दाखल झाले होते.  आणि त्यांनी सायरेत मतकल कमांडो युनिटमध्ये  सैनिक म्हणून काम केले. त्यांनी न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये  शिक्षण घेतले आणि इस्रायली गुंतवणूक बँकेत काम करण्यापूर्वी पेस विद्यापीठातून एमबीए देखील केले होते.

मोसादचे संचालकांची यादी…

Mossad Director

योसेफ ‘योसी’ कोहेन

बर्नियाच्या आधी असलेले मोसादचे संचालक योसेफ ‘योसी’ कोहेन हे 1979 मध्ये IDF मध्ये दाखल झाले, त्यांनी स्वेच्छेने पॅराट्रूपर म्हणून काम केले, एक टीम लीडर म्हणून त्यांनी कार्य केले, त्यानंतर ते गुप्तचर खात्यात ऑफिसरचे प्रभारी होते. जानेवारी 2016 मध्ये मोसादमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी मोसादचे उपप्रमुख आणि इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणूनही काम केले होते.

पाच वर्षांच्या सेवेची अट

मोसादच्या प्रमुखाने पाच वर्षे सेवा करणे अपेक्षित असते. मोसादचे 10 वे संचालक मीर दागन यांनी 2002-2011 पर्यंत काम केले आणि इस्रायलच्या पंतप्रधानांनी कोहेनचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढवला देखील होता.  मोसादचे आधीचे प्रमुख कमी वर्षे या पदावर होते. डॅनी याटोम यांनी 1996 ते 1998 या काळात मोसादचे नेतृत्व केले परंतु 1997 मध्ये जॉर्डनमधील पॅलेस्टीनी अतिरेक्यांवर झालेल्या  हल्ल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.  मोसादच्या एजंटांनी खालेद मशाल यांच्या कानात विष टाकून त्यांची हत्या करण्याचा कथित प्रयत्न केला होता. त्यांनी बनावट कॅनेडियन पासपोर्ट कव्हर म्हणून वापरले होते, त्यामुळे राजनैतिक संकट निर्माण झाले होते.

मोसादची सुरुवात

इस्रायलचे संस्थापक आणि पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी स्थापन केलेल्या मोसाद संघटनेचा पाया  1940 च्या दशकात घातला गेला.  ज्यूंना वाचवणे आणि अरब अतिरेक्यांवर हल्ले करणे यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आल्याचे मोसादच्या वेबसाईटवर म्हटेल आहे.

मोसाद गुप्तचर संघटना सुरुवातीला संरक्षण मंत्रालयाच्या अधीन होती आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत दोन उद्दिष्ठांसाठी ही संघटना कार्यरत होती.  गुप्त  माहीती गोळा करणे ( मुख्यतः युरोपमध्ये )  आणि  दोन विश्लेषण करणे.  तेल अवीवमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात या संस्थेचे कार्यालय होते.

 मोसादच्या कारवायांवर चित्रपट

मोसाद तिच्या स्थापनेपासूनच तिच्या  खतरनाक आणि धाडसी  ऑपरेशन्समुळे चर्चेत राहीली आहे.. ‘ऑपरेशन फिनाले’  नाझी गुन्हेगार ॲडॉल्फ इचमनचा पाठलाग करणे,  इस्रायली ऑलिम्पिक संघाच्या 11 सदस्यांची म्युनिक येथे साल  1972 मध्ये हत्या झाली होती. यातील सामील लोकांना मोसादने अगदी वेचून वेचून ठार केले होते. त्यासाठी  ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’ राबविले गेले. त्यावर दिग्दर्शक  स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा चित्रपट  Munich (2005)  प्रसिद्ध आहे, ‘रेड सी डायव्हिंग रिसॉर्ट’ , True Spies: Operation Brothers हे चित्रपट आणि  टेलिव्हिजन मालीका देखील चित्रित करण्यात आल्या आहेत.

इराण आणि इस्रायलमध्ये तणाव

गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणाव आहे, इराणच्या तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या झाल्याने आता इराण याचा बदला घेणार असे म्हटले जात आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला (IRGC) हानियाना मोसादने संपविल्याचा संशय आहे. तेहरानमधील इस्माईल हानियाच्या निवासस्थानी मोठा बॉम्बस्फोट घडवून त्यांची हत्या घडविली होती. इस्माईल हानियाच्या निवासस्थानावर झालेल्या स्फोटाला आणि इस्माईल हानियाच्या मृत्यूला हमासने इस्रायलला जबाबदार धरले आहे.

इस्माईल हानिया कोण  ?

पॅलेस्टाईन संघटना हमासनेही हानियाच्या मृत्यू इस्रायलला जबाबदार धरले आहे. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी समारंभासाठी हनिया तेहराणला गेले होते. त्यानंतर मंगळवारी इराणच्या काही नेत्यांशी झालेल्या भेटीनंतर त्यांच्या निवासस्थानी बॉम्बस्फोट घडवून ही हत्या घडविण्यात आली. इस्रायलने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण इस्रायल परकीय भूमीवर घडविलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्विकारत नाही. इस्माईल हानिया यांचा जन्म 1962 मध्ये गाझा पट्टीत झाला होता.  गाझा पट्टीवर राज्य करणारी पॅलेस्टिनी राजकीय संघटना हमासने 6 मे 2017 रोजी खालेद मेशाल यांच्या जागी इस्माईल अब्दुल सलाम अहमद हानिया यांची 2017 मध्ये राजकीय ब्युरोचे प्रमुख म्हणून निवड केली. पॅलेस्टिनी नेते म्हणून इस्माईल हानिया यांना ओळखले जात होते.

1948 मध्ये इस्रायल राज्याची निर्मिती झाल्यानंतर अस्कलान शहरातून निर्वासित झालेल्या गाझामधील शांती निर्वासित शिबिरात जन्मलेल्या हानियाने गाझामधील अल-अजहर संस्थेत शिक्षण घेतले होते. तसेच इस्लामिक विद्यापीठातून अरबी साहित्यात पदवी प्राप्त केली. या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर गाझामध्ये इस्त्रायली हल्ल्यात त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये  ईस्माईल हानिया यांनी गाझापट्टी सोडली आणि ते कतारमध्ये निर्वासित जीवन जगत होते. गाझामधील हमासचा सर्वोच्च नेता येह्या सिनवार हा इस्रायलवर गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता, ज्याने इस्त्रायल-हमास युद्धाला सुरुवात केली.

इब्राहिम रईसी आणि मोहसेन फखरीजादेह यांच्या हत्या

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हा अपघात इस्रायलने ड्रोनद्वारे घडविला होता असे म्हटले जात आहे. त्या आधी इराणचे अणूशास्रज्ञ मोहसेन फखरीजादेह ( Mohsen Fakhrizadeh ) यांची 27 नोव्हेंबर 2020 मध्ये तेहराणच्या बाहेर रस्त्याच्या कडेला ते कारमधून जात असताना सेटॅलाईट कंट्रोल मशिनगनद्वारे हत्या झाली होती. त्यांच्या सोबत 11 बॉडीगार्डचा ताफा होता. तरीही त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले नव्हते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी हमासच्या राजकीय प्रमुख ईस्माईल हानिया याच्या हत्येचा  बदला घेण्याची शपथ घेतली आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.