देशाची ओळख INDIA की भारत?, जाणून घ्या कुठून आला हा शब्द
INDIA or Bharat : भारताची खरी ओळख इंडिया की भारत?, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख यांच्या स्टेटमेंटनंतर या विषयावर चर्चा सुरू झाली. भागवत यांनी देशाचं नाव इंडिया नव्हे तर भारत म्हणा, असं म्हंटलं. भारत शब्द कुठून आला आणि इंडियासारखे शब्द कुठून आले. संविधान काय म्हणते ते पाहुया.
नवी दिल्ली, ४ सप्टेंबर २०२३ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी असं आवाहन केलं की, इंडिया नव्हे तर भारत म्हणा. भारताची खरी ओळख काय आहे. इंडिया की भारत? तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हा विषय सर्वोच्च न्ययालयात याचिकेच्या माध्यमातून आला. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की, देशाचे नाव भारत असे आहे. इंडिया म्हणून नये. असे निर्देश केंद्र सरकारला द्यावे. मुख्य न्यायाधीश बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांनी या याचिकेला खारीज केले. यासंदर्भात सरकारकडे जाण्यास सांगितले. कारण संविधानात इंडिया म्हणजे भारत असा उल्लेख आहे. भारत भूमी असा नामोल्लेख करण्याचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. यापैकी काही नाव आहेत. त्यात भारतवर्ष, जंबू द्वीप, आर्यावर्त, अजनाभवर्ष, हिन्द, हिंदुस्थान, भारत खंड, हिमवर्ष या नावांचा समावेश आहे.
ऐतिहासिक ग्रंथ, पुराण काय म्हणतात?
अयोध्येचे आचार्य रघुनाथ दास शास्त्री म्हणतात, भारतवर्ष म्हणजे पृथ्वीवर असलेले सर्व देश. भारत वर्षात ९ द्विप आहेत. भारत हा जंबू द्विपचा भाग आहे. इतर देश वेगवेगळ्या द्विपाचे भाग आहेत. एखादा संकल्प करताना भारवर्षाचा उल्लेख करतो.
श्रीमद भागवतगीतेच्या पंचम स्कंदात १९ आणि २० व्या अध्यायात भारतवर्षाची चर्चा आहे. नामकरण तीन प्रकारे झाला. पहिल्या ऋषभदेवांचा मुलगा भरत, राजा दशरथाचा मुलगा भरत आणि दृश्यंत यांचा मुलगा भरत. वेगवेगळ्या कालखंडात भारतवर्षाचे नाव तीन भरत यांच्या नावानुसार पडले. तिन्ही भरत आपआपल्या काळात महान होते. त्यांचे फार मोठे राज्य होते. परंतु, दृश्यंत यांचा मुलगा भरत यांच्या नावावरून भारत नाव पडल्याचं सांगितलं जातं.
याशिवाय भरत नावाच्या काही कहाण्या आहेत. विष्णू पुराण, अग्नीपुराण, ब्रम्हांड पुराण, लिंग पुराण, मार्कंडय पुराण, वायू पुराण, मत्स्य पुराण या ग्रंथातही भारतवर्षाचा उल्लेख आहे.
इंडिया कुठून आला?
इंडिया शब्दासंदर्भात काही प्रसिद्ध गोष्टी आहेत. इंडिया शब्द सिंधू घाटीतील सभ्यतेमुळे आला. युनानी आणि तुर्क यांनी सिंधू घाटीतून त्यांनी प्रवेश केला. सिंधूचा हिंदू आणि हिंदूचा हिंदुस्थान झाला. इंग्रजीमध्ये सिंधू घाटीला इंडस व्हॅली म्हणतात. इंग्रजांना हिंदुस्थान म्हणण्यात अडचण होत होती. इंडस व्हॅलीचा आधार घेऊन ते इंडिया म्हणू लागले. त्यानंतर इंडिया असं नाव प्रसिद्ध झालं.
संविधान निर्मात्यांमध्ये वाद
१९४९ साली हरी विष्णू कामथ यांनी इंडिया म्हणजे भारताला इंडियामध्ये बदलण्याची सूचना केली. सेठ गोविंद दास यांनी फक्त भारत नावाची शिफारस केली. कमलाप्रसाद त्रिपाठी यांनी इंडिया म्हणजे भारत अशी सूचना केली. त्यामुळे इंडिया म्हणजे भारत असा उल्लेख संविधानात करण्यात आला.