National Science Day : 28 फेब्रुवारीलाच का होतो ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा? काय आहेत कारणे अन् उद्देश?

विज्ञान अर्थात 'सायन्स'हा एक केवळ शिक्षण क्षेत्रातलाच भाग नाही तर यामधून जे बदल घडतात ते देशाला दिशादर्शक ठरतात. त्यामुळे विज्ञानाला एक वेगळे महत्व आहे. काळाच्या ओघात अनेक बाबींचे महत्व कमी होते विज्ञानाच्या माध्यमातून जे संशोधन केले जाते त्याचे महत्व अधिक कोरले जाते. असेच संशोधन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केले होते. त्यामुळे सबंध देशात आज विज्ञान दिवस साजरा केला जात आहे.

National Science Day : 28 फेब्रुवारीलाच का होतो 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरा? काय आहेत कारणे अन् उद्देश?
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 5:15 AM

मुंबई : विज्ञान अर्थात ‘सायन्स’हा एक केवळ शिक्षण क्षेत्रातलाच भाग नाही तर यामधून जे बदल घडतात ते देशाला दिशादर्शक ठरतात. त्यामुळे विज्ञानाला एक वेगळे महत्व आहे. काळाच्या ओघात अनेक बाबींचे महत्व कमी होते विज्ञानाच्या माध्यमातून जे संशोधन केले जाते त्याचे महत्व अधिक कोरले जाते. असेच संशोधन भारतीय (Physicist) भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केले होते. त्यामुळे सबंध देशात आज (National Science Day) विज्ञान दिवस साजरा केला जात आहे. (The Work of Researchers) संशोधकांचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी ठरावे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या अनुशंगाने सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था एवढेच नाही तर शास्त्रज्ञ आणि संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी ‘रामन परिणामा’चा शोध लावला होता. या त्यांच्या कार्याचा गौरव करीत 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीयच नव्हते तर अशिया खंडातील पहिले व्यक्ती होते. तेव्हापासून हा दिवस देशामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जात आहे.

संशोधन संस्था अन् विद्यापीठ उभारणीत योगदान

चंद्रशेखर वेंकट रामन यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथेच त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख पद भूषवले. तसेच 1947 साली ते बंगळुरुमधील रामन संशोधन संस्थेचे संचालक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठांना उभारणीत रामन यांचा मोलाचा वाट होता. त्यांच्या या कामगीरीसाठी त्यांना 1954 साली भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वौच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारकडून दरवर्षी वेगळी थीम घेऊन हा दिवस साजरा केला जात आहे.

भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रामन यांचे कार्य

भौतिकशास्त्रातील आपल्या संशोधनामध्ये त्यांना रामन इफेक्टचा शोध लावला. याच संशोधनातून पुढे रामन स्कॅटरींगचा शोध लागला. जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण धुळ कण विरहीत, पारदर्शक रासायनिक संयोगातून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणाच्या विरुद्ध दिशेला तयार होतो. हा पसरलेला प्रकाशाचे किरण एकाच तरंगाचे असतात. मात्र, काही प्रकाश किरण हे सोडण्यात आलेल्या प्रकाशाच्या किरणांहून वेगळ्या तरंगाचे असतात यालाच रामन इफेक्ट असे म्हणतात. या शोधासाठी त्यांना नोबेल व्यतिरिक्त 1954 मध्ये सर्वोच्च भारतीय पुरस्कार ‘भारतरत्न’ने गौरवण्यात आलं.

नेमका उद्देश काय?

संशोधकांच्या कार्याचा आढावा आजच्या विद्यार्थी आणि तरुणांसमोर ठेऊन देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती व्हावी हा मुख्य उद्देश आहे. देशात अणुऊर्जेविषयी असलेली लोकांच्या मनातील भीती दूर करणे आणि अणुऊर्जेने देशाचा अथक विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो. विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी हा त्या मागचा उद्देश असून ‘राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद’ व ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच बरोबर ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान किंवा संशोधनामध्ये आवड आहे त्यांना प्रोत्साहित करण्याचा देखील सरकारचा मानस आहे.

या वर्षीची काय आहे ‘थीम’ ?

दरवर्षी एक नवी संकल्पना घेऊन हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 ची थीम नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टीकोन”, समोर ठेऊन हा दिवस साजरा केला जात आहे. विज्ञानाशी संबंधित सर्व मुद्द्यांचे आणि विषयांचे सार्वजनिकपणे कौतुक करणे आणि प्रोत्साहन देणे हा यामागील हेतू आहे.

संबंधित बातम्या :

कॉमेडियन ते राष्‍ट्रपती : रशियापुढं नतमस्तक न होणाऱ्या वोलोदिमीर जेलेंस्की यांचा प्रेरणादायी प्रवास!

Nawab Malik | यूपीत जन्म, भंगारवाला, 25व्या वर्षी पहिली निवडणूक, मंत्री ते ईडीची अटक! मलिकांच्या 25 मोठ्या गोष्टी

नानाजी देशमुख यांची आज पुण्यतिथी, भारतरत्न पुरस्काराने करण्यात आले होते सन्मानित

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.