Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Civil Defence Day : काळाच्या ओघात नागरी संरक्षण व्यवस्थेतेचे वाढते महत्व, काय आहे उद्देश?

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्या सुरु असलेल्या युध्दाच्या दरम्यानच जागतिक संरक्षण दिन साजरा होत आहे. त्यामुळे नागरी संरक्षण किती महत्वाचे आहे हे प्रकर्षाने जाणवत असून हा दिवस साजरा करण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होतो की नाही, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. नागरी संरक्षणामध्ये देशातील नागरिक, मालमत्ता, नागरी संस्था, उद्योगधंदे यांचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्था म्हणजे नागरी संरक्षण व्यवस्था होय.

World Civil Defence Day : काळाच्या ओघात नागरी संरक्षण व्यवस्थेतेचे वाढते महत्व, काय आहे उद्देश?
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 5:05 AM

मुंबई : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्या सुरु असलेल्या युध्दाच्या दरम्यानच ( Civil Defence Day) जागतिक संरक्षण दिन साजरा होत आहे. त्यामुळे (Civil protection) नागरी संरक्षण किती महत्वाचे आहे हे प्रकर्षाने जाणवत असून हा दिवस साजरा करण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होतो की नाही, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. नागरी संरक्षणामध्ये देशातील नागरिक, मालमत्ता, नागरी संस्था, उद्योगधंदे यांचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्था म्हणजे नागरी संरक्षण व्यवस्था होय. इतर वेळी या व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असले तरी सध्या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या दरम्यान ही व्यवस्था किती महत्वाची आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे. आधुनिक काळात नागरी (Protection) संरक्षण हे राष्ट्राच्या एकूण संरक्षणनीतीचाच एक अविभाज्य असा घटक मानला जातो. नागरी संरक्षणाची पारंपरिक कल्पना ही केवळ प्रतिबंधक उपायांपुरतीच मर्यादित असल्याचे दिसते तर शत्रूचे आक्रमण आणि विध्वंसक कारवाया यांपासून नागरिकांना झळ पोचू नये या हेतूने प्रतिकारात्मक व प्रतिबंधक अशी दुहेरी व्यवस्था आधुनिक काळात केली जाते. नैसर्गिक, तांत्रिक आपत्ती आणि बचाव कार्यापासून लोकांमध्ये संरक्षणाविषयी जागृती करणे हा या संरक्षण दिनाचा उद्देश असून तो साध्य होणे ही काळाची गरज आहे.

कुठे झाला निर्णय?

1990 पासून हा दिवस साजरा केला जातो. International Civil Defence Organisation च्या जनरल असेम्ब्लीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. नागरी संरक्षण म्हणजे देशाच्या, राज्याच्या नागरिकांना हल्ल्यांपासून, मोठ्या संकटांपासून आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचावणे. देशाच्या आणि राज्याच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अर्धसैनिक दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल कार्यरत असतात. या दिवसानिमित्त दरवर्षी एक थीम ठरवलेली असते. आपणही सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता वाढवूया, स्वतःचे संरक्षण, बचाव कार्य करूया आणि संकटसमयी सवयंसेवक बनून देशाचे नागरिकत्व बजावुया!

असा साजरा केला जातो जागतिक संरक्षण दिन

1990 मध्ये आयसीडीओ जनरल असेंब्लीच्या निर्णयाद्वारे तयार करण्यात आलेला जागतिक नागरिक संरक्षण दिवस 1 मार्च रोजी दरवर्षी साजरा केला जातो. 1972 मध्ये आंतर-सरकारी संघटना म्हणून आयसीडीओ संविधानाच्या अंमलबजावणीसाठी हा दिवस साजरा केला जातो. विविध राष्ट्रीय कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात. संभाषण, परिषद, रेडिओ आणि दूरदर्शन वादविवाद इत्यादी. नागरी संरक्षणाची संरचना आणि सध्या उपलब्ध असलेल्या तांत्रिक साधन व उपकरणाच्या विकासाचा आढावा यानिमित्ताने घेतला जातो.

काय आहे उद्देश?

संरक्षण मग ते कोणत्याही बाबींचे असो की नागिकांचे याबाबत जागृती निर्माण करणे या दिवसाचे उद्दीष्ट आहे. नागरी संरक्षणाचे महत्व लक्षात आणून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दरम्यान, स्वत:च्या संरक्षणासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या पध्दतीने मार्गदर्शन केले जाते. अपघात किंवा आपत्ती निर्माण प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करावी याची जाणीव करुन देणे यासारखे संरक्षणाचे उद्दीष्ट ठेऊन हा दिवस साजरा केला जातो.

संबंधित बातम्या :

National Science Day : 28 फेब्रुवारीलाच का होतो ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा? काय आहेत कारणे अन् उद्देश?

कॉमेडियन ते राष्‍ट्रपती : रशियापुढं नतमस्तक न होणाऱ्या वोलोदिमीर जेलेंस्की यांचा प्रेरणादायी प्रवास!

युक्रेनमध्ये डॉक्टर होण्यासाठी का जातात विद्यार्थी? काय आहे तिथल्या MBBS चं वैशिष्ट्य? वाचा सविस्तर…

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.