Earthquake | भूकंप किती रिश्टर स्केलचा, किती रिश्टर स्केल नुकसानकारक पाहा
रिश्टर स्केल - रिश्टर मापन ही नेमकी भूकंपाची धक्क्याचे प्रमाण आणि त्याची बाहेर पडण्याची ऊर्जा मोजण्याचे काम करते.
मुंबई : भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. रिश्टर स्केलवर भूकंप तीव्र आहे की सौम्य हे ओळखता येतो, यावरुन किती नुकसान झालं असेल याचा देखील सहज अंदाज येतो.एक युनिटने जेव्हा रिश्टर स्केल वाढतो,तेव्हा त्याची ऊर्जा दहापटीने वाढते. रिश्टर स्केल – रिश्टर मापन ही नेमकी भूकंपाची धक्क्याचे प्रमाण आणि त्याची बाहेर पडण्याची ऊर्जा मोजण्याचे काम करते. रिश्टर स्केलवरच भूकंपाची तीव्रता ठरते, म्हणून केव्हाही भूकंपाची माहिती आल्यावर तो किती रिश्टर स्केलचा आहे, याची माहिती सर्वात आधी दिली जाते. देशाने अनेक जास्त तीव्रतेचे भूकंप पाहिले आहेत, त्यात महाराष्ट्रात १९९३ साली किल्लारीचा, तर गुजरातने २००१ साली भूजचा.
Richter scale पाहा किती रेश्टर स्केलचा भूकंप अधिक धोकायदायक, केवढ्या किती नुकसानाची शक्यता
रिश्टर स्केल 1.0 ते 2.9 | तीव्रता सौम्य | लोकांना सहसा जाणवत नाही | दरवर्षी १ लाख धक्के
रिश्टर स्केल 3.0 ते 3.9 | तीव्रता सौम्य | धक्के काहींना जाणवतात, नुकसान नाही | दरवर्षी १२ हजार ते १ लाख
रिश्टर स्केल 4.0 ते 4.9 | तीव्रता कमी | धक्के सर्वांना जाणवतात, कमकुवत जुन्या इमारतींना धोका | दरवर्षी २०० ते २ हजार
रिश्टर स्केल 5.0 ते 5.9 | मध्यम | कमकुवत जमीन, घरांना धोका | 200–2,000 दरवर्षी
रिश्टर स्केल 6.0–6.9 | शक्तीशाली | लोकसंख्या जास्त असलेल्या भागात नुकसान | 20–200 दरवर्षी
रिश्टर स्केल 7.0–7.9 |विनाशकारी | दूरपर्यंत जीवघेणा |3–20 दरवर्षी
रिश्टर स्केल 8.0 आणि त्यापेक्षा जास्त, | हाहाकार उडवणारा | मोठ्या क्षेत्रफळात जिवित हानी
तुर्कीत नुकत्याच झालेल्या भूकंपाची तीव्रता रेश्टर स्केल वर ७.८ नोंदवण्यात आली होती, तर न्यूझीलंडमध्येही भूकंपाची तीव्रता ही 6.1 नोंदवण्यात आली आहे. तुर्कीत भूकंपात आतापर्यंत ४१ हजार जणांचा जीव गेला आहे, हा या वर्षाचा आतापर्यंतचा सर्वात जास्त नुकसान करणारा भूकंप ठरला आहे.
महाराष्ट्रात ३० सप्टेंबर १९९३ रोजी सर्वात मोठा भूकंप झाला, लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे या भूकंपाने फार मोठं नुकसान केलं. सर्वजण साखर झोपेत असताना हा भूकंप झाल्याने फार मोठं नुकसान झालं, कारण पहाटे ३.५६ ला हा भूकंप झाला, तेव्हा उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याला हा मोठा फटका होता. उमरगा आणि औसा तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झालं, ५३ हजार घरं जमीन दोस्त झाली.
गुजरातमध्ये देखील २००१ साली भूजला भूकंप झाला, हा भूकंप २६ जानेवारी २००१ रोजी, म्हणजे भारताच्या ५६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झाला. हा भूकंप सकाळी ८.४६ मिनिटांनी झाला.यात २० हजार लोकांचा मृत्यू झाला होता.7.6 एवढी रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता होती.