भूतलावर एवढं सोनं आलं कुठून, पृथ्वीवर सोनं नेमकं आहे तरी किती ?
भारतीयांना सोन्याचे प्रचंड अप्रुप आहे. भारतात महिलांनाच नव्हे तर पुरूषांना देखील सोन्याचे दागिने घालण्याची हौस आहे. भारतात बहुतांश सोनं हे ज्वेलरीसाठी वापरले जाते, परंतू परदेशात सोन्याच्या धातूला एक गुंतवणूक म्हणून पाहीले जाते. सोन्याच्या खरेदीत एकेकाळी आपला पहिला क्रमांक होता. आता तो आपल्या पासून हिरावला गेला आहे.
मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : भारतातच नाही तर जगभरात सोन्याला प्रचंड मागणी आहे. सोनं सर्वांनाच आवडतं. परंतू तुम्ही कधी विचार केला आहे का ? की पृथ्वीवर एवढं सोनं आले कुठून ? कोळशासारखी सोन्याची निर्मिती येथेच झाली आहे की दुसरीकडून सोनं इकडं आलं आहे. खाणीत सोनं कसं तयार झालं.? आणि केव्हा समजलं की हा धातू महागडा आहे. चला पाहूया संशोधक याबाबत काय म्हणतात. पृथ्वीवर किती सोन सध्या उपलब्ध आहे ? सोनं कुठे आणि कधी पासून मिळालं या सर्वांची उत्तरं पाहूयात आपण…
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे शास्रज्ञ अनेक वर्षांपासून यावर संशोधन करीत आहेत. परंतू संशोधनातून आलेले निष्कर्ष हैराण करणारे आहेत. एस्ट्रोनॉमी मध्ये प्रकाशित अहवालानूसार शास्रज्ञांनी म्हटले आहे की जेव्हा पृथ्वी तयार झाली तेव्हा सोनं पृथ्वीवर नव्हतं. पृथ्वीच्या जन्मानंतर अनेक उप ग्रहांचे गोळे तिच्यावर धडकत राहीले. सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर अवकाशातून उल्का कोसळत राहील्या. तेच आपल्या सोबत सोनं आणि प्लॅटियम घेऊन आल्याचं म्हटले जात आहे. ज्यावेळी ही टक्कर झाली त्या घटनेला विज्ञानाच्या भाषेत ले अक्रीशन म्हटले जाते. तेव्हा चंद्राच्या आकाराचा अशनी पृथ्वी कोसळला होता. त्याच्यासोबतही अनेक खनिज पदार्थ देखील पृथ्वीवर आले.
पृथ्वीवर आहे एवढं प्रचंड सोनं
शास्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या एकूण वजनापैकी 0.5 टक्के वजन टक्करीमुळे निर्माण झाले आहे. तुम्ही हे जाणून आश्चर्यचकीत व्हाल की पृथ्वीवर एवढे सोनं आहे की जर सर्व सोनं एकत्र केले तर संपूर्ण पृथ्वीवर 12 फूटापर्यंत भरता येईल असं म्हटले जाते. सध्या पृथ्वीवासीयांकडून जेवढ्या सोन्याचा वापर केला जातो. त्याचा 75 टक्के भाग एका शतकात काढला आहे. अजूनही खूप सारं सोनं पृथ्वीच्या पोटात लपलेलं आहे. जेवढ्या आपण आत जाऊ तेवढं सोनं मिळेल असं म्हटले जात आहे.
चंद्राच्या निर्मितीनंतर झाला बदल
संशोधकांचे म्हणणे आहे की चंद्राची निर्मितीनंतर पृथ्वीवर अशनी कोसळण्याचे प्रमाण वाढले होते. परंतू 3.8 अब्ज वर्षांपूर्वी अंतराळातील घडोमोडी अशा बदलल्या ही मोठाले अशनी कोसळणे थांबले. त्यामुळे खनिज पदार्थ येणे बंद झाले. एका काळी भारतीय सोने खरेदीत क्रमांक एकवर होते. परंतू आज चीन आपल्या पुढे गेला असून आपण दुसऱ्या क्रमांकावर आलो आहोत. भारतात सोने हे ज्वेलरीसाठी वापरले जाते. तर चीनमध्ये याचा वापर गुंतवणूक म्हणून केला जातो.