बाबासाहेब आंबेडकर कोणत्या तीन लोकांना मानत होते गुरु, आत्मचरित्रात काय केला उल्लेख?

| Updated on: Apr 14, 2025 | 10:00 AM

Bhimrao Ambedkar Birth Anniversary: बाबासाहेब यांना गुरु मानणारे कोट्यवधी लोक आहेत. परंतु स्वत: बाबासाहेब आंबेडकर कोणाला आपले गुरु मानतात? त्या बाबतचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात आहे. 'माझी आत्मकथा' या आत्मचरित्रात त्यांनी आपण कोणामुळे घडलो ते स्पष्टपणे मांडले आहे.

बाबासाहेब आंबेडकर कोणत्या तीन लोकांना मानत होते गुरु, आत्मचरित्रात काय केला उल्लेख?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
Follow us on

Dr Babasaheb Ambedkar Birth Anniversary: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती देशभरात आज उत्साहात साजरी होत आहे. बाबासाहेब यांनी फक्त भारतीय संविधानाची निर्मिती केली नाही तर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले कर्तव्य गाजवले. यामुळे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. त्यांनीच दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. ‘आधुनिक भारताचे निर्माते’ त्यांना म्हटले जाते.

बाबासाहेब कोणाला म्हणतात गुरु

बाबासाहेब यांना गुरु मानणारे कोट्यवधी लोक आहेत. परंतु स्वत: बाबासाहेब आंबेडकर कोणाला आपले गुरु मानतात? त्या बाबतचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात आहे. ‘माझी आत्मकथा’ या आत्मचरित्रात त्यांनी आपण कोणामुळे घडलो ते स्पष्टपणे मांडले आहे. आपल्या जीवनास कोणामुळे दृष्टी मिळाली अन् आपले गुरु कोण आहेत, ते बाबासाहेबांनी म्हटले आहे. त्यांनी बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले या तिघांना आपले गुरु म्हटले आहे. या लोकांचा बाबासाहेब यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला.

पहिले शिक्षक बुद्ध

बाबासाहेबांनी आपल्या जीवनात क्रांती आणण्याचे श्रेय पहिले गुरु गौतम बुद्ध यांना दिले आहे. कृष्णाजी अर्जुन केळुसकर म्हणजेच दादा केळुसकर यांनी गौतम बुद्धांवर चरित्र लिहिले होते. त्यांनी एका समारंभात गौतम बुद्धांचे हे चरित्र बाबासाहेबांना भेट म्हणून दिले. ते पुस्तक वाचून आपला भारवलो. बुद्ध चरित्र वाचल्यानंतर आपला रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथांवरील विश्वास उडला. मी गौतम बुद्ध यांचा अनुयायी झालो, असे बाबासाहेबांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

दुसरे गुरु कबीर

बाबासाहेब म्हणतात, माझे दुसरे गुरु संत कबीर आहेत. त्यांच्यात किंचितही भेदभाव नव्हता. ते खऱ्या अर्थाने महात्मा होते. मी गांधींना मिस्टर गांधी म्हणतो. त्यामुळे मला खूप पत्रे येतात. ज्यामध्ये अशी विनंती आहे की मी गांधीजींना फक्त महात्मा गांधी म्हणून बोलावे. पण मी त्याच्या विनंतीला महत्त्व दिले नाही. मला संत कबीरांची शिकवण या लोकांसमोर मांडायची आहे.

तिसरे गुरु महात्मा फुले

बाबासाहेब आपले तिसरे गुरू महात्मा ज्योतिबा फुले आहेत, असे सांगतात. ते म्हणतात, मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या देशात पहिली मुलींची शाळा उघडली गेली. तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिकवणींनी माझे जीवन घडवले आहे, असे बाबासाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.