तुम्ही ब-याचदा पाहिले असेल कि, नसांचा रंग आपल्याला निळा दिसतो. खासकरुन जास्त गोरे असणा-या आणि वयोवृध्द लोकांमध्ये आपल्याला हा फरक अधिक प्रकर्षाने दिसुन येतो. यातच सर्वात मोठा प्रश्न हा आहे कि, यातून वाहणारे रक्त जर लाल रंगाचे असते तर मग या नसांचा रंग निळा कसा? विज्ञान सांगते कि, नसांचा रंग हा निळा नसतो. मात्र तरिही आपल्याला यांचा रंग निळा का दिसतो, चला तर मग जाणून घेऊयात या प्रश्नाचे उत्तर…
जाणकारांच्या मते हे एक ऑप्टिकल इम्यूजन आहे, म्हणजेच हा एक भ्रम आहे. प्रकाशाची किरणे असे होण्यामागचे खरे कारण आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्रकाशात सात रंग असतात. यांपैकी जो कोणताही रंग एखाद्या गोष्टीवर पडून परावर्तित होतो, तोच रंग आपल्याला दिसून येतो.
जसं की एखादी वस्तू प्रकाशाच्या सातही किरणांना परावर्तित करते तेव्हा ती आपल्याला पांढरी दिसून येते आणि जी वस्तू या सगळ्या किरणांना अवशोषित करते ती आपल्याला काळी दिसून येते. किरणांच्या परावर्तनाचा हा सिध्दांत नसांच्या बाबतीतही लागू होतो.
नसांमध्ये लाल रंगाचे रक्त वाहत असते, या पध्दतीने विचार केला तर ते लाल रंगाचेचे दिसून यायला हवे. मात्र असे होत नाही, विज्ञानानुसार प्रकाशाच्या किरणांमध्ये सात रंग असतात. त्यामुळे ज्यावेळेस प्रकाशाची किरणे नसांवर पडतात त्यावेळी लाल रंगाची किरणे अवशोषित म्हणजे एब्जॉर्ब होतात. याचवेळी किरणांमध्ये असणारा निळा रंग अवशोषित होत नाही तर तो परावर्तित होतो. याच कारणामुळे आपल्याला नसा निळ्या रंगाच्या दिसून येतात.
विज्ञानानुसार किरणांचा जो रंग परावर्तित होत असतो तोच रंग आपल्याला दिसून येतो. हे आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो. जसे कि समुद्राच्या पाण्याचा रंग पारदर्शी असतो, मात्र दूरवरुन पाहिल्यानंतर तो आपल्याला निळा दिसून येतो. दिवसा जेव्हा सुर्याची किरणे पाण्यावर पडतात त्यावेळेस प्रकाशातून निघणा-या दुस-या रंगांच्या किरणांना पाणी एब्जॉर्ब करते, मात्र निळ्या रंगाच्या किरणांना परावर्तित (रिफलेक्ट) करते. प्रकाशाच्या याच परिवर्तनामुळे समुद्राचा रंग आपल्याला निळा दिसून येतो, पण प्रत्यक्षात तो निळा नसतो.
रक्त लाल रंगाचे का असते, हे सुध्दा समजून घेवूया. रक्तामध्ये हिमोग्लोबीन असल्यामुळे याचा रंग लाल असतो. हे एक प्रकारचे प्रोटीन असते जे आयरन आणि प्रोटीन यांच्यापासून तयार होत असते. याउलट काही जीवांमध्ये रक्त लाल किंवा हिरव्या रंगाचे सुध्दा पाहायला मिळते. जसे कि ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग हा निळा असतो. त्याच्या रक्तात असणा-या निळ्या रंगाच्या हीमोसायनिन प्रोटीनमुळे आपल्याला त्याच्या रक्ताचा रंग निळा दिसून येतो.
लग्नानंतर पीएफ खात्यात वारसाचे नाव कसे करावे अपडेट; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि नियम
Retirement Rights Day | चला, जाणून घेऊयात, निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार…!
रेल्वेत मध्यभागीच का असते AC बोगी; सर्वसाधारण डब्बा का असतो एकदम सुरुवातीला अथवा मागच्या बाजूला?