Cheater 420 : भामट्यांना श्री 420 च का म्हणतात, 520 का बरं नाही?

Cheater 420 : भामट्यांना, फसवणूक करणाऱ्यांना 420 च का बरं म्हणत असतील, काय आहे यामागील कारण?

Cheater 420 : भामट्यांना श्री 420 च का म्हणतात, 520 का बरं नाही?
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 10:14 AM

नवी दिल्ली : ‘अरे, त्यावर कशाला विश्वास ठेवतो, एक नंबरचा 420 माणूस आहे तो’, ‘काही बोलू नकोस, तू तर 420 निघालास मित्रा’, असे संवाद अनेकदा आपल्या कानावर आदळतात. फसवणूक करणाऱ्या (Fraud) अथवा धोका देणाऱ्या (Bluff Master) व्यक्तीला, भामट्याला समाजात 420 असे संबोधल्या जाते. त्याच नावाने त्याची ओळख असते. त्या व्यक्तीसंबंधाच्या संवादाची सुरुवातच 420 ने होते. पण अशा भामट्यांना 419 वा 520 का बरं म्हटल्या जात नसेल? त्याला 420चं (Use of 420 for cheating) का म्हटल्या जात असेल, यामागची भानगड आहे तरी काय? चला तर 420 संख्या आणि भामटा अथवा धोका देणारा, फसवणूक करणारा यांच्यात काय कनेक्शन आहे ते पाहुयात..

तसं पाहिलं तर ही केवळ एक संख्या आहे. पण या संख्येला कायद्याचा आधार आहे. भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) याचं एक कलम 420 हे आहे. इंग्रजांच्या काळात हा कायदा तयार करण्यात आला आहे. भारतीय गुन्ह्याशी संबंधित तरतूदींचा यामध्ये समावेश आहे.

420 ही संख्या इंग्रजीतील शब्द Cheating शी संबंधित आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, भारतीय दंड संहितेतंर्गत 420 कलमान्वये धोका देणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या भामट्यांवर कारवाई होते. त्यामुळे जो कोणी फसवणूक करतो, धोका देतो त्याच्यासाठी ही संख्या वापरण्यात येते. अशा लफंग्याला, भामट्याला समाज, काही लोक 420 म्हणतात.

हे सुद्धा वाचा

फसवणुकीचा प्रकार छोटा असेल तर तो आपसातच सोडविल्या जातो. व्यवहारातील घोळ अथवा देय रक्कम देऊन प्रकरण मिटविण्यात येते. पण घोळ मोठा असल्यास हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाते. आरोपीविरोधात तक्रार देण्यात येते. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार, तक्रार दाखल करण्यात येते. गुन्हा सिद्ध झाल्यास न्यायालयात, या कलमातंर्गत शिक्षा ठोठाविण्यात येते.

भारतीय दंड संहितेच्या कलम 420 मध्ये यासंबंधीच्या कायदेशीर तरतूदीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, एखाद्या व्यक्तीने फसवणूक केली. धोका दिला, खोटं बोलून फसवल्यास, संपत्ती हडपल्यास, किंमती वस्तू गायब केल्यास, मोठी रक्कम घेऊन पळून गेल्यास या कलमातंर्गत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

एखाद्या भामटा, बदमाश स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या व्यक्तीला गोडीगुलाबीने, आमिषाने, मदतीचे आश्वासन देऊन जाळ्यात ओढतो. त्याची बनावट स्वाक्षरी करुन, खोट्या पुराव्या आधारे, बोगस साक्षीदारांच्या आधारे फसवणूक करतो. संपत्ती हडपतो, रक्कम बुडवितो, तेव्हा अशा व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो.

भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत दोषीला जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कलम 420 मधील प्रकार अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्ह्याच्या श्रेणीत मोडतो. या प्रकरणात पोलीस ठाण्यातून जामीन घेता येत नाही.

प्रकरणाची सुनावणी न्यायालयासमोर होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर या गुन्ह्याची सुनावणी होते. अशा प्रकरणात दोन्ही पक्षांची तयारी असल्यास तडजोड करता येते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.