Astronomy Day 2022 : अंतराळात लक्ष वेधणारा ‘जागतिक खगोलशास्त्र दिन’

अंतराळ विज्ञानात रस असणारे सर्व लोक अंतराळ वेधशाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांच्या शहरातच दुर्बिणी उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरुन त्यांना खगोलशास्त्राचा अभ्यास करता येईल. याच हेतूने त्यांच्या मनात जागतिक खगोलशास्त्र दिनाची स्वागतार्ह कल्पना आली.

Astronomy Day 2022 : अंतराळात लक्ष वेधणारा 'जागतिक खगोलशास्त्र दिन'
अंतराळात लक्ष वेधणारा 'जागतिक खगोलशास्त्र दिन'Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 7:00 AM

आज 7 मे. यंदा हा दिवस संपूर्ण जगभर ‘जागतिक खगोलशास्त्र दिन‘ (International Astronomy Day) म्हणून साजरा केला जात आहे. अलीकडच्या काळात खगोलशास्त्रामध्ये फार मोठी क्रांती झाली आहे. त्यामुळे हा दिवस जगभर व्यापक प्रमाणात साजरा (Celebration) होऊ लागला आहे. हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो, तोही एका वर्षात दोन वेळा. वसंत ऋतु आणि शरद ऋतू अशा दोन ऋतूमध्ये (साधारणपणे एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये) या दिवसाचे सेलिब्रेशन केले जाते, खगोलशास्त्राची अधिक माहिती, जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (Why do we celebrate Astronomy Day? Know the history and significance in marathi)

खगोलशास्त्र दिन साजरा करण्यामागील हेतू

जागतिक खगोलशास्त्र दिन साजरा करण्यामागील हेतू व्यापक आहे. सर्वसामान्यांना खगोलशास्त्राची ओळख करून द्यावी, ज्याअंतर्गत सामान्य लोक, हौशी खगोलशास्त्रज्ञ, अवकाश विज्ञानात रस असलेले लोक एकमेकांना भेटतील. ते लोक एकमेकांच्या कल्पनांचा वापर करून अवकाश विज्ञानाचे मनोरंजक आणि अनोखे प्रयोग करतात. भारतासह संपूर्ण जगभरातील शाळांमधील मुलांमध्ये अंतराळ विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी दुर्बिणीच्या साह्याने चंद्र, तारे, ग्रह इत्यादींचे निरीक्षण करण्यासारखे अनेक मनोरंजक प्रयोग केले जातात. हे प्रयोग केल्यामुळे मुलांमध्ये खगोलशास्त्र सखोल जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. अशा कार्यक्रमात सहभागी होऊन अवकाश विज्ञानाची माहिती मिळवता आहे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून ठिकठिकाणी, सर्व देशांत खगोलशास्त्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

जागतिक खगोलशास्त्र दिनाचा इतिहास

जागतिक खगोलशास्त्र दिनाची सुरुवात 1973 मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झाली. उत्तर कॅलिफोर्नियाच्या खगोलशास्त्रीय संघटनेचे अध्यक्ष डग बर्गर यांनी या दिवसाची सुरुवात केली होती. अंतराळ विज्ञानात रस असणारे सर्व लोक अंतराळ वेधशाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांच्या शहरातच दुर्बिणी उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरुन त्यांना खगोलशास्त्राचा अभ्यास करता येईल. याच हेतूने त्यांच्या मनात जागतिक खगोलशास्त्र दिनाची स्वागतार्ह कल्पना आली. त्याच अनुषंगाने त्यांनी वर्षातून दोनदा त्यांनी शहरे, शॉपिंग मॉल्स, गल्लीबोळ इत्यादी ठिकाणी त्यांनी छोट्या दुर्बिणी लावल्या. त्यांची ही कल्पना कामी आली. उत्तरोत्तर जागतिक खगोलशास्त्र दिनात अधिकाधिक लोकांनी खूप रस दाखवला. पूर्वी ज्या लोकांनी दुर्बिणीने आकाशाचा अभ्यास केला नव्हता, त्यांनीही दुर्बिणींचा वापर केला आणि त्यांची खगोलशास्त्राविषयीची आवड वाढली. त्यामुळे खगोलशास्त्र क्लब आणि खगोलशास्त्र वेधशाळेत लोकांची गर्दी होऊ लागली. अमेरिकेत ही संकल्पना यशस्वी झाल्यानंतर जगातील इतर देशांनी या संकल्पनेचा स्वीकार केला. त्यामुळे संपूर्ण जगभरातील शाळा, महाविद्यालये आणि खगोलशास्त्र क्लबमध्ये दरवर्षी दोनदा खगोलशास्त्र दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले. (Why do we celebrate Astronomy Day? Know the history and significance in marathi)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.