Cough Syrup: कफ सायरप कसे तयार होते?, तज्ज्ञांकडून समजून घ्या
कफ सायरपमुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो. डायरियासारखे आजार होऊ शकतात.
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात भारत सरकारने तीन कफ सायरपबाबत अलर्ट जारी केला. इराकमध्येही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. भारतात तयार झालेल्या कफ सायरपमध्ये काही त्रृटी आढळल्या आहेत. इराकमध्ये पुरवण्यात आलेली कफ सायरप आरोग्यासाठी चांगली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. सायरपचा वापर सर्दी कमी करण्यासाठी केला जातो. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कफ सायरपचे काही साईड इफेक्ट आहेत. काही प्रकरणात यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. डब्ल्यूएचओने कफ सायरपबाबत इशारा दिला आहे. कफ सायरपमुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो. डायरियासारखे आजार निर्माण होऊ शकतात. आता आपण जाणून घेऊया कफ सायरप कशी तयार होते.
सायरपमध्ये या घटकांचे मिश्रण
कफ सायरप तयार करण्यासाठी डेक्सट्रोमेथॉर्फन, गुईफेनेसीन, अंटीहिस्टामाई यांचे मिश्रण असते. या तिन्ही घटकांना एकत्र केले जाते. सायरप गोड होण्यासाठी कृत्रीम स्वीटनर किंवा डायथीलीन ग्लाईकोलचा वापर केला जातो. डायथीलीनचा वापर यासाठी केला जातो जेणेकरून सायरप खराब होणार नाही. डायथीलीनचा वापर मर्यादित प्रमाणात करावा लागतो. हे सोल्यूशन गरम केले जाते. त्यानंतर थंड करून सायरप तयार होते.
अशी होते प्रक्रिया
कफ सायरपची क्वालीटी तपासण्यासाठी सॅम्पल्स घेतल्या जातात. सायरप योग्य आहे की, नाही याची तपासणी केली जाते. टेस्ट झाल्यानंतर कफ सायरपच्या बॉटल्स तयार केल्या जातात. त्यानंतर पॅकेजिंग, लेबलिंग केले जाते. डोस किती घेतला पाहिजे. कोणते कंटेन्ट वापरले आहेत. याची सर्व माहिती दिली जाते. सायरप सप्लाय करण्यासाठी फार्मा कंपनी बाजारात पाठवते.
गडबड कुठं होते
सफदरजंग रुग्णालयाचे डॉ. दीपक कुमार म्हणाले, कफ सायरपमध्ये काही गडबड दिसली तर डब्लूएचओच्या लॅबमध्ये टेस्ट केली जाते. डायथीलीन ग्लाइकोलची मात्रा जास्त असल्यास ते आरोग्यसाठी हानीकारक ठरू शकते. लघवी व्यवस्थित न होणे, किडनीमध्ये इंफेक्शन होणे, गंभीर लक्षणांनी मृत्यू होणे, असे परिणाम दिसून येतात.
डायथीलीनची मात्रा जास्त झाल्याने त्रास
आतापर्यंत ज्या कफ सायरपमध्ये गडबड दिसून आली त्या सर्वांमध्ये डायथीलीनची मात्रा जास्त होती. डायथीलीनची मात्रा जास्त असल्यास अशा आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. यामुळे पोट साफ न होणे, उलटी होणे, किडनी वाईट परिणाम होणे अशा समस्या निर्माण होतात. डब्लूएचओच्या मानकानुसार काही औषध कंपन्या औषध तयार करत नाहीत.