फोनवर सर्व प्रथम का बोलले जाते Hello?; जाणून घ्या याची कहाणी

कॉल करताना हॅलोचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी हे माहित असावे की टेलीफोनचा शोध महान शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्राहम बेल(Alexander Graham Bell) यांनी लावला होता. (Why is Hello spoken first on the phone; Know the story)

फोनवर सर्व प्रथम का बोलले जाते Hello?; जाणून घ्या याची कहाणी
फोनवर सर्व प्रथम का बोलले जाते Hello?
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 7:05 PM

नवी दिल्ली : हॅलो (Hello) हा शब्द फार सामान्य आहे आणि आपण सर्वजण हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. कुणाला फोन केल्यानंतर किंवा फोन आल्यानंतर आपण सर्व प्रथम हॅलो बोलतो. हॅलो(Hello) हा इंग्रजी शब्द आहे, हा जुना जर्मन शब्द हाला किंवा होलापासून आला आहे. हाला किंवा होलाचा अर्थ होता ‘कसे आहात’. तथापि, काळानुसार हा शब्द बदलला. हा होलाहून हालो बनला आणि नंतर हालू झाला. हळूहळू नंतर हा हॅलो बनला. आजच्या काळात एखादी व्यक्ती सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, फोन करताना सर्वच जण पहिला शब्द हॅलो बोलतात. परंतु आपणास कधी हा प्रश्न पडला आहे की फोननर प्रथम शब्द हॅलो का बोलला जातो ते? (Why is Hello spoken first on the phone; Know the story)

अलेक्झांडर ग्राहम बेलने फोनवर प्रथम हॅलो बोलले का?

कॉल करताना हॅलोचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी हे माहित असावे की टेलीफोनचा शोध महान शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्राहम बेल(Alexander Graham Bell) यांनी लावला होता. काही अहवालांमध्ये असे म्हटले जाते की ग्रॅहम बेलने फक्त टेलिफोनच नव्हे तर हॅलो या शब्दाचा शोध लावला होता. मीडिया रिपोर्टनुसार ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव मार्गारेट हेलो असे होते. टेलिफोनचा शोध लावल्यानंतर, ग्राहम बेलने आपल्या मैत्रिणीला फोन केला आणि तिचे नाव घेत म्हटले हेलो. यानंतर फोनवर कॉल केल्यानंतर सर्वप्रथम हेलो शब्द बोलण्याचा ट्रेंड सुरू झाला. परंतु बर्‍याच अहवालांमध्ये असा दावाही केला जातो की ग्राहम बेल आणि मार्गारेट हेलोची ही कहाणी हेलोच्या प्रारंभाविषयी ऐकली गेली तर ती चुकीची आहे.अहवालानुसार, ग्रॅहम बेलची मैत्रीण मेबेल हॉवर्ड होती, तिच्याशी ग्राहम बेल यांनी नंतर लग्न केले.

थॉमस अल्वा एडिसन यांना हॅलो या शब्दाचे श्रेय

फोन कॉलवर हॅलो या शब्दाच्या जन्माबद्दल आणखी एक सिद्धांत आहे. दाव्यानुसार, हॅलो हा शब्द प्रथम सन 1833 मध्ये लिहिला गेला. हेलो हा शब्द प्रथम 1844 मध्ये फोन कॉलवर वापरला गेला होता. या सिद्धांतानुसार, फोनवर प्रथम हॅलो बोलण्याचे श्रेय थॉमस अल्वा एडिसन या दुसर्‍या महान वैज्ञानिकाला जाते. विकिपीडियावरही या गोष्टीचा उल्लेख आहे. थॉमस अल्वा एडिसन(Thomas Alva Edison) यांनी फोनवर हॅलोला बोलल्यानंतरच फोन कॉलच्या सुरूवातीस हॅलो बोलण्याची परंपरा सुरू झाली जी अजूनही चालू आहे. आश्चर्य म्हणजे आज कोणत्याही फोन कॉलवर हॅलो बोलण्याची प्रथा केवळ एक-दोन देशांमध्येच नाही तर संपूर्ण जगात आहे. जेव्हा थॉमसने प्रथमच फोनवर हॅलो बोलले होते तेव्हा फोनवर ‘आर यू देयर’ म्हणजेच ‘तुम्ही तिथे आहात’ असं म्हटलं होतं. पण थॉमस यांना फोन केल्यानंतर इतके मोठे वाक्य अजिबात आवडले नाही. (Why is Hello spoken first on the phone; Know the story)

इतर बातम्या

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात दोन महिने मासेमारीसाठी बंदी, मंत्री अस्लम शेख यांची घोषणा

राज्य सरकारला लाथ घातल्याशिवाय जाग येत नाही, EWS आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विनायक मेटेंचा प्रहार

एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.