आकाशाचा रंग निळा का असतो ? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना माहिती नाही, पाहा नेमके काय उत्तर ?

पृथ्वीवरुन आपण जेव्हा मोकळ्या आकाशाकडे पाहातो. तेव्हा आपल्याला निळ्या रंगाचे आकाश दिसते. परंतू आकाश निळ्या रंगाचे का दिसते ?

आकाशाचा रंग निळा का असतो ? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना माहिती नाही, पाहा नेमके काय उत्तर ?
blue skyImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 2:00 PM

नवी दिल्ली | 2 ऑक्टोबर 2023 : अनेक खगोलीय घटना आपल्या अवती भवती नित्य आपण पाहात असतो. परंतू त्यांचे उत्तर आपणाला माहीती नसते. विज्ञानाकडे अशा प्रत्येक गोष्टीचे उत्तर असते. परंतू आपण अनेकदा लक्षात ठेवत नाही. आणि मग कोणी आपल्याला विचारले की आकाशाचा रंग निळा का ? तर मग आपण डोकं खाजवत बसतो. किंवा गुगल सर्च करतो. असाच एक प्रश्न आहे तर सोपा परंतू त्याचे उत्तर अनेकांकडे नसते. हा प्रश्न आहे आकाशाचा रंग निळा का असतो.?

पृथ्वीवरुन आपण जेव्हा मोकळ्या आभाळाकडे पाहात असतो. तेव्हा आपल्याला निळ्या रंगाचे आकाश दिसते. तुम्ही कधी विचार केला आहे का ? आकाशाचा रंग निळा का असतो ? जर सुर्याची किरणे सफेद, पांढरी असतात. तर आकाश का निळे असते. QUORA वेबसाईटवर जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा अनेकांनी आपआपल्या पद्धतीने उत्तरे दिली. या उत्तरांना आणि वैज्ञानिक तथ्यांना मिळून पाहूयात आकाशाचा निळा रंग कसा दिसतो ते..

पृथ्वी भोवतीचे वातावरणाचा थर विविध गॅसेस पासून बनला आहे. अनेक युजरनी QUORA वेबसाईटवर म्हटले की पृथ्वीवर येणारा प्रकाश या वातावरणाचा थरातून पृथ्वीवर पोहचतो. प्रकाश पृथ्वीवर येताना अनेक गॅसेस आणि धुली कणांतून विखुरतो.  प्रकाश सफेद रंगाचा असला तर त्यात सात रंग एकत्र असतात. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा अशा रंगातून सुर्य प्रकाश तयार होतो. जेव्हा सुर्यप्रकाश पसरतो तेव्हा हे रंग किरणांसोबत वेगवेगळ्या तरंगलहरीत पसरतात. या रंगात लाल रंगाच्या तरंगलहरी ( वेव लेंथ )जास्त असते. तर निळ्या आणि जांभळ्या रंगाची वेवलेंथ कमी असते. त्यामुळे सुर्य उगवत वर येतो तेव्हा जांभळा आणि निळा रंग जास्त पसरतो. आणि लाल रंग सर्वात कमी दिसतो.

आकाशाला स्वत:चा रंगच नाही

वायूंचे अणू व कण यांचा आकार प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा लहान आहेत. या अणू व कणांमुळे प्रकाश सगळीकडे पसरत असतो. त्यास रॅलेचे विकिरण असे म्हणतात. विकिरणाच्या या प्रकाशात कण सूक्ष्म असल्याने कमी तरंगलांबीचा निळा प्रकाश अधिक विखुरतो व आपल्याला आकाश निळे दिसते. तसे आकाशाला स्वत:चा रंग नसतो. जांभळा रंगही आकाशात विखुरलेला आहे. परंतू आपले डोळे निळ्या रंगाला अधिक लवकर शोषून घेतात. त्यामुळे आकाळ निळे दिसत असते.

'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.