क्राइम सीनवर पिवळ्याच पट्ट्या का लावलेल्या असतात ? काय आहे कारण ?
रिल लाईफ असो की रिल्स लाईफ गुन्हा घडल्याचे ठिकाण प्रतिबंधित करण्यासाठी नेहमी पिवळ्या पट्टयाच का ? लावतात पाहूयात काय आहे कायदेशीर कारण ?
एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्हा घडल्याच्या ठिकाणी पंचनामा करण्यापूर्वी पोलिस सर्वसामान्यांचा प्रवेश रोखण्यासाठी पिवळ्या पट्ट्या का लावतात. ? क्राईम सीनवर पिवळ्याच रंगाच्या पट्टया का लावतात ? त्यांचा गुन्ह्याच्या ठिकाणाशी काय संबंध असतो? पोलिस अशा पिवळ्या रंगाच्याच पट्ट्या का वापरतात. या निळ्या किंवा लाल रंगाच्या पट्ट्या का नाही लावत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला असतो ? काय आहे या रंगामागे शास्र पाहूयात..
पिवळ्या रंगामागे आहे विज्ञानाची कमाल ?
वास्तविक, पिवळा रंग डोळ्यांना पटकन दिसणारा आणि लक्ष वेधून घेणारा रंग आहे. तसेच पिवळा रंग जगभरात सावधान करण्यासाठी किंवा प्रतिक चिन्हांसाठी वापरला जातो. त्यामुळे वाहतूक चिन्हं असो की इतर चिन्हं पिवळ्या रंगात रंगविलेली असतात. रेल्वे स्थानक आणि रुळांवरील चिन्हे देखील पिवळ्या रंगात रंगविलेली असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना या घटनास्थळापासून दूर राखण्यासाठी पोलिस क्राईम सीनवर पिवळ्या पट्ट्या लावलेल्या असतात. हे क्षेत्र प्रतिबंधित असल्याचे दर्शविण्यासाठी हा पिवळा रंग वापरला जातो.
कायदा आणि सुव्यवस्था रंगाचा काय संबंध ?
अनेक देशात खासकरुन भारत आणि अमेरिका सारख्या देशात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना पिवळ्या रंगाचा वापर केला जातो. या रंगाला आंतरराष्ट्रीय मानाकांनूसार निवडले आहे. कारण हा रंग लांबूनही सहज लक्षात येतो.सार्वजनिक स्थळांवर लोकांना प्रतिबंधित करण्यासाठी हा पिवळा रंग सर्रास वापरला जातो.
या मागे मानसशास्रीय कारण
पिवळ्या पट्ट्या लावण्यामागे मानसशास्रीय कारण देखील आहे. वास्तविक या पिवळ्या पट्ट्यामुळे लोकांना मनात मानसिक अवरुद्ध तयार होतो. लोक या रंगाला पाहातात तेव्हा त्यांच्या मेंदूत स्पष्ट सूचना जाते की काही तर गडबड आहे.त्यामुळे संवेदनशील क्षेत्रापासून सर्वसामान्यांना दूर ठेवण्यासाठी या पिवळ्या रंगाच्या पट्ट्याचा वापर जगभर सूचना दे्ण्यासाछी केला जातो.