जगातील सर्वात महागडा हिरेजडित दागिना, किंमत ऐकून व्हाल थक्क!

तुम्हाला प्रश्न पडला असेल की या हिऱ्याचे नाव काय? त्याची वैशिष्ट्यं काय? याला एवढी किंमत कशी मिळाली? तर याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

जगातील सर्वात महागडा हिरेजडित दागिना, किंमत ऐकून व्हाल थक्क!
diamond
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 3:38 PM

नवी दिल्ली : तुम्ही अनेक लिलाव पाहिले ऐकले. त्याबद्दलच्या अनेक बातम्याही ऐकल्या असतील. लिलाव म्हणजे एखाद्या वस्तूसाठी मागेल ती किंमत देणे. काही दिवसांपूर्वी एका जांभळ्या गुलाबी रंगाच्या (purple pink) हिऱ्यासाठी मिलियन डॉलरची किंमत मिळाली होती. विशेष म्हणजे या हिऱ्याच्या लिलावाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या लिलावांमध्ये याचे स्थान सर्वोच्च आहे. या हिऱ्याचा लिलाव 29.3 दशलक्ष डॉलर्समध्ये झाला होता. (World-record Purple-pink Diamond ‘The Sakura’ sold for $29M at auction)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या हिऱ्याचे नाव काय? त्याची वैशिष्ट्यं काय? याला एवढी किंमत कशी मिळाली? तर याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

हिऱ्याचे नाव काय?

या हिऱ्याचे नाव आहे साकुरा. हा एक जपानी शब्द आहे. ज्याचा अर्थ चेरी ब्लॉसम म्हणजे चेरीप्रमाणे खुलणे. ‘दी साकुरा’ हा 15.8 कॅरेटचा जांभळा गुलाबी रंगाचा हिरा आहे. हा हिरा प्लॅटिनम आणि सोन्याच्या अंगठीत बसवण्यात आला आहे. auction.house यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

हा हिरा ‘फॅन्सी विविड’ च्या वर्गीकरणात येतो. त्याचा रंग आणि आकर्षण लक्षात घेता तो फॅन्सीच्या श्रेणीमध्ये ठेवले गेले आहे. मात्र इतर हिऱ्याप्रमाणे त्याचा रंग चमकदार नाही. तसेच तो दूरवरून दिसू शकत नाही. त्याचा जांभळा गुलाबी रंग केवळ सूक्ष्मदर्शकातूनच दिसू शकतो.

हिऱ्याचे वैशिष्ट्यं काय?

हाँगकाँगमध्ये विक्री करणार्‍या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि साकुरा हा हिरा रविवारी एका आशियाई खासगी खरेदीदाराने खरेदी केला. या संस्थेने याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ‘दी साकुरा’ सोबत ‘दि स्वीट हार्ट’ चाही लिलाव करण्यात आला. ही एक 4.2 कॅरेट फॅन्सी रिंग आहे. ज्याचा आकार हृदयासारखा आहे. या रिंगचा लिलाव 6.6 दशलक्ष डॉलर्समध्ये झाला आहे. “जांभळा गुलाबी डायमंड रिंगच्या लिलावातून सध्या बाजारात रत्नांना मोठी मागणी आहे, असे दिसून येत आहे. तसेच पुढील काळात ती अजूनही चालूच राहिल, असे क्रिस्टी आशिया-पॅसिफिक विभागाच्या ज्वेलरीचे अध्यक्ष विक्की सिक यांनी सांगितले.

अनेक विक्रम मोडीत

दि साकुरा या नावाच्या दागिन्यांनी गेल्या वर्षाचा विक्रम मोडला होता. ज्यामध्ये 14.8 कॅरेटच्या जांभळ्या-गुलाबी हिऱ्याचे दागिन्याची विक्री 27 दशलक्ष डॉलर्सला केली गेली होती. याला स्पीरिट ऑफ द रोज असे नाव देण्यात आले होते. याचा लिलाव गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जिनिव्हा मध्ये झाला होता. हा 27.8 कॅरेट हिरा कापून बनवण्यात आले होते. हा हिरा 2017 मध्ये उत्तर-रशियाच्या याकुतिया येथील एका खाणीतून काढण्यात आला होता. रशियात आतापर्यंत उत्खनन करण्यात आलेल्या हिऱ्यापैकी हा सर्वात मोठा मानला जातो.

रशियासोबत खास नाते

‘दि स्पिरिट ऑफ द रोज’ ला कट डायमंड ज्वेलरीच्या नावामागे मोठी कथा आहे. रशिया आणि पोलंडची प्रसिद्ध बॅले नृत्यांगना वसलाव निजिंक्सकी नावावर ठेवण्यात आले होते. त्यांच्या स्टेज परफॉर्मन्सचे नाव देखील स्पीरिट ऑर द रोज असे असायचे. एका आकडेवारीनुसार, केवळ 1 टक्के डायमंडचे दागिने हे 10 कॅरेटपेक्षा जास्त किंमतीचे असतात. ज्यात 4 टक्के ग्रेडिंग देखील असते.  (World-record Purple-pink Diamond ‘The Sakura’ sold for $29M at auction)

संबंधित बातम्या :

Video : 4 समोसे 20 रुपयांचे की 40? व्हायरल व्हिडीओत चिमुरड्याचा युक्तिवाद तुम्हीच पाहा

आपल्याला माहित आहे का कुणी लावला थर्मामीटरचा शोध? जाणून घ्या भारताशी काय आहे नाते?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.