यंदा पैशांचा पाऊस कुणावर? आयपीएलसाठी 1003 नवे खेळाडू उत्सुक

मुंबई : आयपीएलच्या बाराव्या सीझनसाठी लिलाव 18 डिसेंबरला जयपूरमध्ये होणार आहे. या लिलावात आठ फ्रँचायझी संघात 70 जागांसाठी 1003 खेळाडूंनी त्यांच्या नावाची नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. यावेळी कुणावर पैशाचा पाऊस पडतो त्याकडे लक्ष लागलं आहे. पूर्वेकडील राज्य, उत्तराखंड आणि बिहारच्या क्रिकेटपटूंसह 232 परदेशी […]

यंदा पैशांचा पाऊस कुणावर? आयपीएलसाठी 1003 नवे खेळाडू उत्सुक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : आयपीएलच्या बाराव्या सीझनसाठी लिलाव 18 डिसेंबरला जयपूरमध्ये होणार आहे. या लिलावात आठ फ्रँचायझी संघात 70 जागांसाठी 1003 खेळाडूंनी त्यांच्या नावाची नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. यावेळी कुणावर पैशाचा पाऊस पडतो त्याकडे लक्ष लागलं आहे.

पूर्वेकडील राज्य, उत्तराखंड आणि बिहारच्या क्रिकेटपटूंसह 232 परदेशी खेळाडूंनीही लिलावासाठी त्यांच्या नावाची नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये 800 खेळाडूंनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, ज्यात भारताच्या 746 खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे 70 नशिबवान खेळाडू कोण असतील याची उत्सुकता आहे.

परदेशातील खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे 35, तर अफगाणिस्तानच्या 27 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक दक्षिण आफ्रिकेच्या 59 खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी नाव नोंदवलंय. अमेरिका, हाँगकाँग आणि आयर्लंडचाही प्रत्येकी एक खेळाडू या यादीत आहे.

लिलावाच्या या यादीचं वर्गीकरण केलं जाईल आणि फ्रँचायझींना आपल्या आवडत्या खेळाडूंची यादी देण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. दरवर्षी खेळाडूंवर बोली लावताना सूत्रसंचन करणारे रिचर्ड मेडले यावेळी उपलब्ध नसतील. सूत्रसंचालनाची जबाबदारी ह्यू एडमिडेस यांच्यावर देण्यात आली आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.