पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह, राज्य सरकारचे आरटीपीसीआर किट बोगस : बबनराव लोणीकर
राज्याने 12 लाख 50 हजार बोगस आरटीपीसीआर (RTPCR ) किट्स खरेदी केल्याचा आरोप माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलाय. (12 lakh bogus RTPCR kits in the state said Babanrao Lonikar)
जालना : महाराष्ट्र् सरकारने 12 लाख 50 हजार बोगस आरटीपीसीआर (RTPCR ) किट्स खरेदी केल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केलाय. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत असून, राज्य सरकारचे आरटीपीसीआर किट बोगस असल्याचे लोणीकर म्हणाले आहेत. याबाबत बबनराव लोणीकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे. (Babanrao Lonikar on RTPCR kit)
बबनराव लोणीकर आपल्या तक्रारीत म्हणाले आहेत की, “राज्य सरकारने खरेदी केलेल्या आरटीपीसीआर किट्स बोगस आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे अहवाल आरटीपीसीआर चाचणीमध्ये निगेटिव्ह येतायत. आयसीएमआरने याबाबत तपासणी देखील केली आहे. आयसीएमआरच्या तपासणीत आरटीपीसीआर किट्स बोगस असल्याचं सिद्ध झालं आहे.” (12 lakh bogus RTPCR kits in the state said Babanrao Lonikar)
राज्य सरकारचा कोरोना रुग्णसंख्या लपवण्याचा प्रयत्न
बबनराव लोणीकरांनी आपल्या तक्रारीत राज्य सरकार रुग्णसंख्या लपवत असल्याचा आरोप केलाय. त्यांनी तक्रारीत सांगितलंय की, “महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 लाखांच्या पुढे गेला आहे. देशात सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हा आकडा राज्य सरकार लपवू पाहत आहे.” तसेच कोरोनाग्रस्तांची संख्या कमी दाखवण्यासाठी राज्य सरकार बोगस आरटीपीसीआर किट्स खरेदी करत आहे असंही ते म्हणाले आहेत.
रुग्णांच्या जिवाशी खेळू नका
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. रुग्णाला कोरोनाची लागण झाली तरी, रिपोर्ट्स निगेटिव्ह दाखवले जात आहेत. पाच महिन्यांपूर्वी 100 संशयितांची तपासणी केली असता, 35 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह यायचे. आता 100 लोकांपैकी फक्त 6 ते 15 जण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. तशा तक्रारी राज्यातील डॉक्टरांनी केल्यायत. त्यामुळे राज्यात रुग्णसंख्या लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत, लोणीकर यांनी ठाकरे सरकारवर शरसंधान साधले आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या जिवाशी खेळू नका असे आवाहनही बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी त्यांच्या तक्रारीत केले आहे.
संबंधित बातम्या :
Babanrao Lonikar | शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करावी : बबनराव लोणीकर
Babanrao Lonikar | सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री नाराज, लवकरच सरकार पडेल : बबनराव लोणीकर
जालन्यात 6 महिन्यांपासून विकास ठप्प, दुर्बिणीतूनही विकास पाहायला मिळेना : बबनराव लोणीकर
(12 lakh bogus RTPCR kits in the state said Babanrao Lonikar)