Pune Lockdown | पुण्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन, तरीही 14 हजार 109 नव्या रुग्णांची भर
लॉकडाऊनच्या काळात गेल्या 9 दिवसात पुण्यात तब्बल 14 हजार 109 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
पुणे : पुण्यात 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर (Corona Virus Cases Increases In Pune) करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या 9 दिवसात पुण्यात तब्बल 14 हजार 109 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, यादरम्यान पुण्यात 230 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे (Corona Virus Cases Increases In Pune).
सध्या पुण्यात 10 दिवसांच्या या लॉकडाऊनचे दोन टप्पे करण्यात आले होते. पहिल्या पाच दिवसात संपूर्णत: कडक लॉकडाऊन करण्यात आला. त्यांनतर 19 जुलैपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मात्र, लॉकडाऊन काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कुठेही कमी होतांना दिसत नाही. शिवाय, मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे. मात्र, चाचण्या वाढवण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. 23 जुलैच्या मध्यरात्री हा लॉकडाऊन संपणार आहे.
पुण्यातील लॉकडाऊनच्या काळात किती रुग्ण वाढले?
दिनांक | नवे रुग्ण | मृत्यू |
---|---|---|
14 जुलै | 750 | 25 |
15 जुलै | 1416 | 15 |
16 जुलै | 1812 | 17 |
17 जुलै | 1705 | 11 |
18 जुलै | 1838 | 18 |
19 जुलै | 1508 | 44 |
20 जुलै | 1817 | 31 |
21 जुलै | 1512 | 30 |
22 जुलै | 1751 | 39 |
एकूण | 14109 | 230 |
पुण्यात कोरोनाचे 63,351 रुग्ण
पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे 63 हजार 351 कोरोना रुग्ण आहेत. तर 22 हजार 484 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनामुळे पुण्यात आतापर्यंत 1 हजार 514 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
राज्यात दिवसभरात 10,576 नवे कोरोना रुग्ण
राज्यात आज (22 जुलै) दिवसभरात सर्वाधिक 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले आहेत. हा आकडा गेल्या 15 दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3 लाख 37 हजार 607 वर पोहोचला आहे. याशिवाय, राज्यात आतापर्यंत 12 हजार 556 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Maharashtra Corona Update | दिवसभरात 10,576 नवे कोरोना रुग्ण, गेल्या 15 दिवसातील सर्वात मोठा आकडाhttps://t.co/DTNlJjlQJf@rajeshtope11 #coronainamaharashtra #CoronaUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 22, 2020
Corona Virus Cases Increases In Pune
संबंधित बातम्या :
Pune | बेड न मिळाल्याने ठिय्या देणाऱ्या पुण्यातील रुग्णाचा मृत्यू, महापौरांचा कारवाईचा इशारा
PMC Corona | पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुखांना कोरोना, 12 कर्मचारीही पॉझिटिव्ह
Pune Corona | पुण्याची कोरोना आकडेवारी चुकीची, यंत्रणांच्या समन्वयाअभावी आकड्यात घोळ