‘बाहुबली’वरही ‘थलैवा’ भारी, ‘2.0’ची छप्परफाड कमाई
मुंबई : रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर गुरुवारी प्रदर्शित झाला. 2.0 हा चित्रपट भारतात तब्बल 6600-6800 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटातील व्हीएफएक्स जबरदस्त आहेत. हा चित्रपट 3D मध्ये पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून एक चांगला संदेशही देण्यात आला आहे. मोबाईलचा […]
मुंबई : रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर गुरुवारी प्रदर्शित झाला. 2.0 हा चित्रपट भारतात तब्बल 6600-6800 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटातील व्हीएफएक्स जबरदस्त आहेत. हा चित्रपट 3D मध्ये पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून एक चांगला संदेशही देण्यात आला आहे. मोबाईलचा अति वापर आपल्यासाठी किती घातक ठरु शकतो, हे या चित्रपटातून सांगण्यात आहे आहे. यात अक्षय कुमार निगेटीव्ह भूमिका निभावत असून या चित्रपटातून अक्षयने दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
गुरुवारी 2.0 हा चित्रपट जगभरात 14 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला, तसेच हा चित्रपट जगभरात एकाचवेळी प्रदर्शित करण्यात आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल 100 कोटींची कमाई करत इतर सर्व मोठ-मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 543 कोटीमध्ये बनलेला हा चित्रपट आजपर्यंतचा सर्वाधिक महागडं बजेट असणारा चित्रपट आहे. त्यातच आता पहिल्याच दिवसाच्या कमाईने शतक गाठल्याने या चित्रपटाच्या नावे आणखी एक रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. याआधी आमीर खानच्या ठग्ज ऑफ हिंदोस्तान ने पहिल्या दिवशी 50 कोटींची गल्ला जमवला होत.
2.0च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 20-25 कोटींची कमाई केली. जर या चित्रपटाची इतर भाषांमधील कमाई जोडली तर चित्रपटाने 100 कोटींची आकडा पार केला आहे. आठवड्याच्या शेवटी चित्रपटाचे कलेक्शन आणखी वाढू शकते. हा चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडणार असा अंदाज सिनेसमिक्षकांकडून वर्तवला जात आहे.
2.0 हा चित्रपट रजनीकांत आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा 2010 साली आलेल्या रोबोट चित्रपटाचा सिक्वेल आहे. रोबोटने 200 कोटी 89 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता.