सोलापूरमध्ये मिथेन गॅसची टाकी पडली, विषारी वायूची गळती; दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू

| Updated on: Nov 22, 2020 | 11:19 AM

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी रात्री मिथेन गॅसची टाकी पडून विषारी वायूची गळती झाल्याने दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ((2 dead in ‘methane’ gas leak at loknete agro industry factory in solapur))

सोलापूरमध्ये मिथेन गॅसची टाकी पडली, विषारी वायूची गळती; दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू
Follow us on

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी रात्री मिथेन गॅसची टाकी पडून विषारी वायूची गळती झाल्याने दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. तर आठ कामगार अत्यवस्थ झाले असून या कामगारांवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सदर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ((2 dead in ‘methane’ gas leak at loknete agro industry factory in solapur))

मोहोळ तालुक्यातील अनगर येथेली लोकनेते अॅग्रो इंडस्ट्री कारखान्यात मिथेन गॅसची टाकी अचानक खाली पडली. मध्यरात्री १२च्या सुमारास ही घटना घडली. टाकी पडल्याचा आवाज आल्याने कामगारांची एकच धावपळ उडाली. काही कामगार या टाकीजवळ धावत गेले. मात्र टाकी लिकेज होऊन त्यातून विषारी वायू गळतीस सुरुवात झाली. त्यामुळे कामगारांना खोकला लागला आणि मळमळ होऊ लागली. काही कामगारांना उलट्याही झाल्याचं सांगण्यात येतं. क्षणार्धात संपूर्ण कारखान्यात गॅस पसरल्याने या कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे कामगार गुदमरले आणि त्यांना भोवळ आली. हा प्रकार लक्षात येताच इतर कामगारांनी अत्यवस्थ कामगारांना तात्काळ दवाखान्यात नेले. मात्र, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता.

तर, इतर आठ कामगारांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. या आठही कामगारांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्य देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, टाकी पडून विषारी वायूची गळती झाल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. त्यामुळे पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विषारी वायूची गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला. या घटनेत मोठी दुर्घटना घडली नाही. ही टाकी कशी पडली? याचा तपास सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

सेट टॉप बॉक्स रिचार्जच्या कारणाने घरात प्रवेश, डेंटिस्ट महिलेची राहत्या घरी हत्या

बंद घराचा कडी-कोयंडा उचकटला, पोटमाळ्यावरुन शेजारच्या घरात चोरी, रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

मालकाची हत्या करून फरार झालेला आरोपी 19 वर्षानंतर सापडला; ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

(2 dead in ‘methane’ gas leak at loknete agro industry factory in solapur)