हडसर किल्ल्यावरुन पडून मुंबईच्या 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू
जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावरुन एका 20 वर्षीय तरुणीचा पडून मृत्यू (Girl death due to fall on Hadsar fort) झाला.
पुणे : जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावरुन एका 20 वर्षीय तरुणीचा पडून मृत्यू (Girl death due to fall on Hadsar fort) झाला. ही घटना आज (19 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच (Girl death due to fall on Hadsar fort) खळबळ उडाली.
मुंबई येथील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर आला होता. सकाळी 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास या गटातील एक तरुणी किल्ल्याच्या बुरूजावरून खाली पडली. खाली पडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.