कल्याण डोंबिवली क्षेत्रात 235 अति धोकादायक इमारती; क प्रभागात सर्वाधिक इमारती; 1852 कुटुंबांचा रहिवास
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी मालक आणि भाडेकरू यांच्यात समझोता करत भाडेकरुना त्यांचा हक्क देण्याबाबत पालिका प्रशासनाने शासनाच्या मदतीने ठोस निर्णय घेतल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो मात्र मागील अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबितच आहेत
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका (Kalyan-Dombivali Municipal Corporation) हद्दीत 235 अतिधोकादायक इमारती (high-risk buildings) असून पालिकेने या इमारती धोकादायक घोषित केल्या असून आणि कधीही पडण्याच्या अवस्थेत आहेत. असे असतानाही या इमारतीमध्ये जवळपास 700 कुटुंबाचे वास्तव्य आहे. वारंवार आवाहन करूनही घर सोडल्यास घरावरील हक्क सोडावा लागेल या भीतीने रहिवासी घरे सोडण्यास तयार नसल्याने या पावसाळ्यात या रहिवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न (safety of the resident) ऐरणीवर येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळयापूर्वी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी घोषित करत जून पूर्वीच अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर केले जाते. मात्र यंदा पालिका आयुक्तांनी पावसाळयाआधी अतिधोकादायक इमारतीवर कारवाई न करता प्रत्येक आठवड्यात अतिधोकादायक इमारतीवर कारवाई करत त्याचा अहवाल देण्याचे निर्देश प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना दिले आहेत.
अतिधोकादायक इमारतीवर हातोडा
यानंतर प्रत्येक प्रभागातील अतिधोकादायक इमारतीवर हातोडा मारण्याची कारवाई सुरु असली तरी कल्याण आणि डोंबिवली शहरात पागडीच्या शेकडो इमारती असून 40 वर्षाहून अधिक काळ रहिवाशी इमारत मालकाला अतिशय अल्प भाडे देत या घरामध्ये राहत आहेत. या इमारतीची विक्री केल्यास भाडेकरूने मालकाला दिलेली डीपॉझिट वगळता उर्वरित रक्कम भाडोत्री आणि इमारत मालक सम प्रमाणात वाटून घेतात. मात्र जर इमारत पाडली किंवा तोडली गेली तर भाडेकरूचा या घरावरीलहक्क नष्ट होत असल्याने त्याला डीपॉझिटची रक्कमदेखील परत मिळत नाही.
अतिधोकादायक इमारतीत वास्तव्य
49 वर्षापूर्वी कल्याण डोंबिवलीतील घराच्या किंमती 100 पटीने वाढल्या असून शहरात घर घेणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेले आहे. त्यातच इमारत मालकाला भाडेकरूचा त्रास बाजूला करून जागा हवी असल्याने हा तिढा आणखीच वाढत आहे. यामुळेच आपण इतकी वर्षे राहत असलेल्या घरात आपल्याला हक्क मिळावा यासाठी रहिवासी घरे सोडण्यास तयार नसून अतिधोकादायक इमारतीत वास्तव्य करून आहेत. या नागरिकांना घराबाहेर काढून इमारतीवर कारवाई करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
पावसाळ्यापूर्वी अनधिकृत इमारतीची यादी जाहीर
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी मालक आणि भाडेकरू यांच्यात समझोता करत भाडेकरुना त्यांचा हक्क देण्याबाबत पालिका प्रशासनाने शासनाच्या मदतीने ठोस निर्णय घेतल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो मात्र मागील अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबितच आहेत. यामुळे पावसाळ्यापूर्वी अनधिकृत इमारतीची यादी जाहीर करत या इमारती पावसाळ्यात पडण्याची प्रतीक्षा केली जाते.
कुटुंबांच्या डोक्यावर भीती
यंदा पालिका प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारी नुसार पालिकेच्या अ प्रभागात 1, ब प्रभागात 15, क प्रभागात 94, ड प्रभागात 7, जे प्रभागात 7, फ प्रभागात 32, ह प्रभागात 40, ग प्रभागात 21, आणि इ प्रभागात 18 अशा एकूण 253 अनधिकृत इमारती असून मागील वर्षभरात 138 अतिधोकादायक इमारतीवर हातोडा मारण्यात आला आहे. तर या धोकादायक इमारती मध्ये सुमारे 700 कुटुंबाचा (1852 नागरिकांचा) रहिवास आहे. प्रशासनाकडून या इमारती रिकाम्या करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी रहिवासी घरे सोडण्यास तर नसल्याने या कुटुंबाच्या डोक्यावर भीतीची टांगती तलवार आहे.