एअर स्ट्राईकमध्ये काय-काय घडलं? एनएसए अजित डोभाल यांच्याच तोंडून ऐका
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून भारतीय वायूसेनेने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता वायूसेनेने ही कारवाई केली. यानंतर सकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी कारवाईबाबत […]
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून भारतीय वायूसेनेने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता वायूसेनेने ही कारवाई केली. यानंतर सकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी कारवाईबाबत माहिती दिली. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे 25 टॉप कमांडर मारल्याचंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएसच्या बैठकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, अर्थमंत्री अरुण जेटली, एनएसए अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे संपूर्ण ऑपरेशन अजित डोभाल यांच्या निगराणीत राबवण्यात आलं.
भारतीय वायू सेनेने नष्ट केलेल्या दहशतवाद्यांच्या कॅम्पमध्ये फायरिंज रेंज, स्फोटक परिक्षण केंद्र, प्रशिक्षकांसाठी वातानुकूलित कार्यालये, प्रशिक्षण घेणाऱ्या दहशतवाद्यांसाठी सुविधा, स्विमिंग पूल, मनोरंजन केंद्र अशा सर्व सुविधा या कॅम्पमध्ये होत्या. यासाठी पैसा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराकडून दिला जायचा. पुलवामा हल्ल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशतवादी जमा झाले होते.
भारतीय वायूसेनेच्या कारवाईत दहशतवादी, प्रशिक्षक, टॉप कमांडर आणि जिहादी मारले गेले. मारल्या गेलेल्या कमांडरमध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचे दोन भाऊ आणि मेहुण्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या कॅम्पमध्ये 42 आत्मघातकी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. या दहशतवाद्यांची यादीच भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.
व्हिडीओ :