महापालिकेच्या नायर कोविड रुग्णालयात त्रिशतक, 300 व्या कोरोनाबाधित मातेची सुखरुप प्रसूती
महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोनाबाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने 300 चा टप्पा काल (13 जून) रात्री पार केला (300 Corona Women delivery in Nair Hospital) आहे.
मुंबई : महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोनाबाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने 300 चा टप्पा काल (13 जून) रात्री पार केला (300 Corona Women delivery in Nair Hospital) आहे. नायर रुग्णालयाच्या या कामगिरीने कोरोना विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. आज (14 जून) सकाळपर्यंत प्रसूतींची एकूण संख्या 302 झाली आहे (300 Corona Women delivery in Nair Hospital).
एप्रिल महिन्यात ‘कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात 14 एप्रिल 2020 रोजी पहिल्या कोरोनाबाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. त्यानंतर गेल्या 2 महिन्याच्या कालावधीत नायर रुग्णालयात 302 कोरोनाबाधीत मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे.
नायरमध्ये कालच तान्हुल्यांच्या टॅ्याह्यांच्या मंगलस्वरांनीही त्रिशतकी टप्पा ओलांडला आहे. बाळांची संख्या आज सकाळ पर्यंत 306 झाली आहे, अशी माहिती नवजात शिशु आणि बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉक्टर सुषमा मलिक, प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या डॉक्टर चारुलता देशपांडे यांनी दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार एकाच रुग्णालयात 300 कोरोनाबाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील आजपर्यंतचे एकमेव उदाहरण आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. राज्यात आतापर्यंत एक लाख 4 हजार 568 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 3 हजार 830 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 49 हजार 346 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
संबंधित बातम्या :
Mumbai Corona | नायर हॉस्पिटलमध्ये 24 तासात 192 कोरोनाबाधित महिलांची यशस्वी प्रसूती