Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIHAR ELECTIONS | तिसऱ्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या 24 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे

बिहार निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी लवकरच मतदान होणार आहे. या जागांसाठी एकूण 1204 उमेदवार उभे राहिले आहेत. त्यापैकी 31 टक्के उमेदवारांवर वेगवेगळ्या तक्रारी असून 24 टक्के उमेदवारांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

BIHAR ELECTIONS | तिसऱ्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या 24 टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे
प्रत्येक मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. अनेक मतदान केंद्रावर पांढऱ्या रंगात गोलाकार वर्तुळही काढण्यात आली. त्या वर्तुळातच मतदानकर्त्यांनी उभे राहावे असे सांगण्यात आले आहे.
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 12:58 AM

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी लवकरच मतदान होणार आहे. या जागांसाठी एकूण 1204 उमेदवार उभे राहिले आहेत. त्यापैकी 31 टक्के उमेदवारांवर वेगवेगळ्या तक्रारी असून 24 टक्के उमेदवारांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. (31 per cent of candidates of bihar third phase election have complaints of various offenses)

बिहार इलेक्शन वॉच अ‌ॅण्ड असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यात एकून 78 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी 1204 उमेदवार मैदानात आहेत. त्यापैकी 1195 उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जात दिलेल्या माहितीनुसार हा अहवाल प्रदर्शित करण्यात आला आहे.

361 उमेदवार कोट्यधीश, भाजपचे 91 टक्के उमेदवार कोट्यधीश

अहवालानुसार तिसऱ्या टप्प्यातील जागा लढणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी 361 उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपच्या 34 उमेदवारांपैकी 31 जणांची संपत्ती कोट्यवधीमध्ये आहे. काँग्रेसमध्येदेखील कोट्यधिशांची संख्या कमी नाही. काँग्रेसच्या एकूण 25 उमेदवारांपैकी 17 जणांची संपत्ती कोटींमध्ये आहे.

37 उमेदवारांविरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे

तिसऱ्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या 37 उमेदवारांविरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. तशी माहिती त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये दिलेली आहे. 20 उमेदवारांविरोधात हत्या, 73 जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे पोलिसांत दाखल आहेत. विशेष म्हणजे तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या एकूण जागांपैकी  92 टक्के भाग हा संवेदनशील आहे.

दरम्यान, बिहारच्या तरुणांना 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिले आहे. तेव्हापासून राष्ट्रीय जनता आघाडीचे (NDA) नेते तेजस्वी यादव यांच्या या दाव्याविषयी प्रश्न उपस्थित करत होते. त्याला उत्तर म्हणून वेळ पडल्यास मी मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन. पण तरुणांना नोकऱ्या नक्की देईन, असे तेजस्वी यादव म्हणाले आहेत.

बिहारमधील सध्याचे राजकीय बलाबल

  • एनडीए : 125
  • राजद : 80
  • काँग्रेस : 26
  • सीपीआय : 3
  • एचएएम : 1
  • एमआयएम : 1
  • अपक्ष : 5
  • खाली : 2
  • (एकूण जागा 243 सीट)

संबंधित बातम्या :

लोकांना नितीश कुमार नको, बिहारचे पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादवच : संजय निरुपम

बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची : संजय राऊत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!

(31 per cent of candidates of bihar third phase election have complaints of various offenses)

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.