महापुरातील मृतांची संख्या 40 वर, पुणे विभागीय आयुक्तांची अधिकृत माहिती

पश्चिम महाराष्ट्रातील महापुरात मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 40 वर पोहचली आहे. याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी रविवारी (11 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली. यावेळी त्यांनी पूरस्थिती आणि मदत कार्याचीही माहिती दिली.

महापुरातील मृतांची संख्या 40 वर, पुणे विभागीय आयुक्तांची अधिकृत माहिती
Follow us
| Updated on: Aug 11, 2019 | 6:36 PM

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील महापुरात मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 40 वर पोहचली आहे. याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी रविवारी (11 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली. यावेळी त्यांनी पूरस्थिती आणि मदत कार्याचीही माहिती दिली. पुराच्या पाणी पातळीत हळुहळु घट होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्त्यावरील पाणी ओसल्यानंतर तात्काळ आवश्यक सुविधांसाठी वाहतूक सुरु करण्यात येईल, असेही नमूद केले.

दीपक म्हैसेकर म्हणाले, “सांगलीत 224 टक्के पाऊस झाला. येथील धरणातून 5 लाख 30 हजार पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सांगलीमधील पाण्याची पातळी 56 वरुन 53.7 पर्यंत खाली आली आहे. कोल्हापूरची पाणी पातळी 2 फुटाने कमी होऊन 51.10 पर्यंत आली आहे. दोन्ही ठिकाणी प्रतितासाला 1 इंच पाणी पातळी कमी होत आहे. असं असलं तरी दोन्ही शहरांमधील सद्यस्थितीतील पाणी अद्यापही धोक्याच्या पातळीवरच आहे. पूर ओसरत आहे हे समाधानकारक आहे. कोल्हापूरची धोक्याची पाणी पातळी 45 आहे. येथे 24 तासात 2 फूट पाणी कमी झाले. या गतीने पाणी कमी झाल्यास सायंकाळपर्यंत कोल्हापूरला रस्त्यानं मदत देता येऊ शकेल. त्यामुळे रस्ता वाहतुकीतून अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू सायंकाळपर्यंत पूरग्रस्तांपर्यंत पोहचतील.”

मृत नागरिकांचा तपशील

या महापुरात आतापर्यंत एकूण 40 नागरिकांचा जीव गेल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. मृतांमध्ये सांगलीतील 19, कोल्हापूरमधील 6, सातारामधील 7 आणि पुण्यातील 7 जणांचा समावेश आहे.

सांगली बोट दुर्घटनेतील 17 जणांचा समावेश आहे. आधी या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याचे तर 6 जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, नव्याने 5 मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा 17 झाला. तसेच एक बेपत्ता व्यक्ती जीवंत सापडला. कोल्हापुरात अद्यापही एक व्यक्ती बेपत्ता आहे.

स्थलांतरित नागरिकांची आकडेवारी

पूरग्रस्त भागातून एकूण 4 लाख 41 हजार 845 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यात सांगलीतील 1 लाख 58 हजार 970, कोल्हापूरमधील 2 लाख 45 हजार 229, सातारामधील 10 हजार 486, सोलापूरमधील 26 हजार 999 नागरिकांचा समावेश आहे.

पूरग्रस्त भागात 3020 वैद्यकीय पथकं पाठवण्यात आली आहेत. पुणे विभागात 30 उपकेंद्रांचा वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे 3 लाख 29 हजार 603 नागरिक प्रभावित आहेत. 1 लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. पुणे विभागात एकूण 163 रस्ते आणि 79 पूल बंद आहेत. आज बँकांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली आहे. यात पूरग्रस्तांना 15 हजार आणि 10 हजार आर्थिक मदतीपैकी 5 हजार रुपये रोख दिले जाणार आहेत, तर उर्वरित रक्कम पीडितांच्या बँक खात्यावर जमा होईल, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर बँकांना ATM सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून चेक आणि पासबूक मागितले जाणार नाही, बायोमेट्रीक मशीनवर युआयडी (UID) किंवा ओळख पटवून पैसे दिले जातील, बीएसएनएल सेवा सायंकाळी सुरळीत करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

पत्रकार परिषदेतील इतर महत्त्वाचे मुद्दे:

  • जिल्हा सहकारी बँका (DCC) पैसे उपलब्ध करून देतील.
  • बँकांसंदर्भातील अधिकार RDC यांना दिले.
  • मृत जनावरांच्या विम्यासाठी शवविच्छेदन करण्याची गरज नाही.
  • महामार्गावर 5 हजार 400 वाहने वळवली आहेत. आता फक्त 4 हजार वाहने उभी आहेत.
  • 469 पैकी 218 ATM सुरु आहेत.

पाणीपुरवठा

  • मिरज पाणीपुरवठा योजना सुरू केली. येथून सांगलीला पाणी दिले जाईल. त्यानंतर लवकरच सांगलीची पाणी योजना सुरू करणार.

साफसफाई

  • सफाईसाठी कचरा गोळा करण्याचे टेंडर काढणार. सफाई काम सुरु झाले असून सफाई साहित्य पुणे जिल्हाधिकारी उपलब्ध करून देतील.

इतर

  • सकाळी हेलिकॉप्टरमधून कोल्हापूरला वैद्यकीय पथकं दाखल.
  • सोमवारी (12 ऑगस्ट) सकाळी 70-80 टक्के गावांचा संपर्क होईल.
  • मंगळवारपासून 5 हजार रुपये रोख रक्कम देण्यास सुरुवात करणार.
  • परिस्थिती पूर्ववत येण्यास किमान 5 ते 6 दिवस लागणार.

मृत प्राण्यांची आकडेवारी

आयुक्तांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार विभागात एकूण 50 गाय, 42 म्हैस, 23 वासरे, 58 शेळी, 11 हजार 100 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढणार असून पाणी ओसरल्यावरच खरा आकडा समजेल, असेही त्यांनी सांगितले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.