फ्रान्सकडून एअरस्ट्राईक; अल कायदाच्या 50 दहशतवाद्यांचा खात्मा
फ्रान्सने 30 ऑक्टोबरला एअरस्ट्राईक (air strike) करुन अल कायदाच्या तब्बल 50 दहशतवाद्यांचा खात्मा केला. फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फ्रान्स सैन्याने माली येथे ही कारवाई केली.

पॅरिस : मोहम्मद पैगंबरांचे व्यगंचित्र वर्गात दाखवल्यामुळे एका शिक्षाकाची हत्या झाल्यानंतर फ्रान्समध्य़े (France) तणावाचं वातावरण आहे. अशातच फ्रान्सने 30 ऑक्टोबरला एअरस्ट्राईक (air strike) करुन अल कायदाच्या तब्बल 50 दहशतवाद्यांचा खात्मा केला. फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फ्रान्स सैन्याने माली देशात ही कारवाई केली. या कारवाईत 50 दहशतवादी ठार झाले असून 4 जणांना जिवंत पकडण्यात फ्रान्स सैन्याला यश आले आहे. (50 al Qaeda terrorists dead in air strike carried out by France military)
फ्रान्समध्ये मोहोम्मद पैगंबर यांच्या व्यगंचित्रावरुन मागील काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. पैगंबर यांचे व्यंगचित्र वर्गात दाखवल्यानंतर एका विद्यार्थ्याने इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकाची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी देश कुठल्याही हिंसेचं समर्थन करणार नसून हिसां करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वीणीचा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर फ्रान्सने ही करवाई केली आहे.
फ्रान्स सरकारने सोमवारी (2 नोव्हेंबर) या एअरस्ट्राईकची माहिती माध्यमांना दिली. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑक्टोबरला फ्रान्सच्या सैनिकांनी एअरस्ट्राईक करत 50 दहशतवाद्यांना ठार केलं असून 4 जणांना जिवंत पकडलं आहे. आफ्रिकेतील बुर्कीना फोसो आणि निगेरच्या सीमाभागात हा हल्ला करण्यात आला. हल्लाच्या ठिकाणाहून अनेक स्फोटकं आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
हल्ल्यात ड्रोन, मिराज जेटचा वापर
या एअरस्ट्राईकसाठी मिराज जेट तसेच ड्रोनची मदत घेण्यात आली. तसेच फ्रान्स सैनिकांनी जवळपास 30 पेक्षा अधिक मोटारसायकलींची या हल्ल्यात नासधूस केली. फ्रान्स सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दहशतवाद्यांचा अलकायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध होता. तसेच ग्रुप ऑफ इस्लाम अॅण्ड मुस्लीम संघटन या संघटनेसाठीसुद्धा हे दहशतवादी काम करायचे. दरम्यान, फ्रान्सने इस्लमिक दहशत वादाविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर इस्लामिक राष्ट्रांकडून फ्रान्सवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. तर फ्रान्सच्या भूमिकेचे भारताने स्वागत केले असून फ्रान्ससोबत असल्याचे भारताने सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्राने प्रचंड त्रास, पण फ्रान्समधील हिंसाचार चुकीचा : असदुद्दीन ओवैसी
(50 al Qaeda terrorists dead in air strike carried out by France military)