Maharashtra corona | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 64 वर, मुंबईत 8, पुण्यात 2 नवे रुग्ण

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 64 वर पोहोचली (Maharashtra corona update) आहे. गेल्या 24 तासात तब्बल 12 नवे रुग्ण आढळले आहेत.

Maharashtra corona | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 64 वर, मुंबईत 8, पुण्यात 2 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 6:27 PM

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 64 वर पोहोचली (Maharashtra corona update) आहे. गेल्या 24 तासात तब्बल 12 नवे रुग्ण आढळल्याने, कोरोनाचा वाढता कहर महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. नव्याने आढळलेल्या 12 रुग्णांमध्ये मुंबईतील 8, पुण्यातील 2, कल्याणमधील 1 आणि यवतमाळमधील एका रुग्णाचा समावेश आहे. (Maharashtra corona update)

दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने (आय सी एम आर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबईत आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 6 जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे, तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे.

मूळचा यवतमाळ येथील रुग्ण जो सध्या मुंबईत भरती आहे, त्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील कोरोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहिणीसोबत दुबईला गेला होता.

पुणे येथील 25 वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक 41 वर्षाची पुण्यातील महिला करोनाबाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

राज्यात आज एकूण २७५ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १८६१ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १२०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे,अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 12
  • पुणे – 11
  • मुंबई – 19
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 4
  • कल्याण – 4
  • नवी मुंबई – 3
  • अहमदनगर – 2
  • पनवेल – 1
  • ठाणे -1
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • उल्हासनगर – 1 एकूण 64

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • मुंबई (1) – 17 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
  • पुणे (1) – 18 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
  • मुंबई (1) – 18 मार्च
  • रत्नागिरी (1) – 18 मार्च
  • मुंबई महिला (1) – 19 मार्च
  • उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
  • अहमदनगर (1) – 19 मार्च
  • मुंबई (2) – 20 मार्च
  • पुणे (1) – 20 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
  • पुणे (2) – 21 मार्च
  • मुंबई (8) – 21 मार्च
  • यवतमाळ (1) – 21 मार्च
  • कल्याण (1) – 21 मार्च
  • एकूण – 64 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
  • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
संबंधित बातम्या 

Reduce AC use | एसीचा वापर कमी करा, आरोग्य मंत्र्यांचा सल्ला, दिवसभरात 11 नवे कोरोना रुग्ण

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.