पुणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनही घोषित करण्यात (Senior Citizen Death due to corona Pune) आले आहे. कोरोनामुळे देशासह राज्यात अनेकांचे मृत्यू झाले आहे. पुणे जिल्ह्यात याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. पुण्यात जिल्ह्यात आतापर्यंत 61 ते 90 वयोगटातील 80 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. तर जिल्ह्यात एकूण 161 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. पुण्यात आज (12 मे) दिवसभरात एकूण तीन कोरोनाबाधित रुग्णांचा (Senior Citizen Death due to corona Pune) मृत्यू झाला आहे.
पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा 61 ते 70 या वयोगटातील रुग्णांना बसला आहे. या वयोगटातील तब्बल 52 रुणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 51 ते 60 वयोगटातील 39 रुग्णांचा, 71 ते 80 वयोगटातील 23 रुग्णांचा, 81 ते 90 या वयोगटात केवळ पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
त्याशिवाय 41 ते 50 वयोगटातील 22 रुग्णांचा, 31 ते 40 वयोगटात 11 रुग्णांचा, 21 ते 30 वयोगटात 2 रुग्णांचा, 11 ते 20 आणि 10 ते 0 वयोगटात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.
पुणे जिल्ह्यात दहा तारखेपर्यंत 156 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूमध्ये सर्वाधिक जास्त रुग्ण हे 61 ते 70 वयोगटातील आहेत. या वयोगटातील मृतांचं प्रमाण हे 33 टक्के आहे. 51 ते 60 वयोगटातील मृतांचं प्रमाण 25 टक्के, 71 ते 80 या वयोगटातील मृतांचं प्रमाण 15 टक्के, 41 ते 50 या वयोगटातील मृतांच प्रमाण 14 टक्के, 31 ते 40 या वयोगटातील मृतांचं प्रमाण सात टक्के आहे. 81 ते 90 या वयोगटातील मृतांचं प्रमाण तीन टक्के आहे. तर 21 ते 30 या वयोगटात मृतांचं प्रमाण एक टक्के आहे. अकरा ते वीस आणि दहा ते शून्य या वयोगटात मृतांचं प्रमाण एक टक्के आहे.
मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. 156 पैकी 65 कोरोनाबाधित महिला मयत असून हे प्रमाण 42 टक्के आहे. तर 91 कोरोना बाधित पुरुष मयत असून हे प्रमाण 58 टक्के आहे. पुण्यात आतापर्तंय 3105 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
पुणे क्षेत्रिय कार्यालयनिहाय कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या (11 मे 2020)
1) भवानी पेठ : 511
2) ढोले पाटील : 409
3) शिवाजीनगर-घोले रोड : 326
4) कसबा-विश्रामबाग : 319
5) येरवडा-कळस-धानोरी : 294
6) बिबवेवाडी : 145
7) धनकवडी-सहकारनगर : 135
8) वानवडी : 132
9) नगररोड : 65
10) हडपसर : 64
11) कोंढवा : 34
12) वारजे-कर्वेनगर : 15
13) सिंहगड रोड : 15
14) औंध-बाणेर : 5
15) कोथरुड-बावधन : 4
संबंधित बातम्या :
नाशिकमध्ये दोन नवजात बाळांना कोरोनाची बाधा, बाधितांचा आकडा 693 वर
भवानी पेठेत कोरोनाचा कहर, 500 च्या वर कोरोनाबाधित रुग्ण
पुण्याच्या विषाणू संस्थेचे मोठे संशोधन, अँटीबॉडी तपासण्याचे किट विकसित