वर्षभरात बुलडाण्यात 96 एसटी बसचे अपघात

गेल्या वर्षभरात बुलढाणा जिल्ह्यातील एसटीच्या अपघातात वाढ (ST bus accident in buldhana) झाली आहे. एकूण 96 अपघात झाले आहेत.

वर्षभरात बुलडाण्यात 96 एसटी बसचे अपघात
Follow us
| Updated on: Jan 08, 2020 | 11:56 PM

बुलडाणा : गेल्या वर्षभरात बुलडाणा जिल्ह्यातील एसटीच्या अपघातात वाढ (ST bus accident in buldhana) झाली आहे. एकूण 96 अपघात झाले आहेत. गाड्या खिळखिळ झाल्याने हे अपघात होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी एसटी बसमध्ये बदल करावेत (ST bus accident in buldhana) अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या एकूण सात आगारांमध्ये जवळजवळ 430 बसेस आहेत. त्यात प्रत्येकी 20 ते 30 बस या निकामी झाल्या असून प्रवासात ब्रेकडाऊन होणे, रॉड तुटणे अशामुळे अपघाताच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे.

बसेसच्या या वाढत्या अपघातास खराब झालेल्या आणि किलोमीटरची मर्यादा पार केलेल्या बसेस कारणीभूत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेली एसटी आता प्रवाशांना नकोशी झाल्याने एसटी महामंडळाला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शिवाय देखभाल आणि दुरुस्ती नसल्याने अपघातांच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 पर्यंत एसटीचे 96 अपघात झाले आहेत. नुकतेच 3 जानेवारी रोजी झालेल्या अपघातात 23 शालेय विद्यार्थी जखमी तर 5 विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर झाली होती. यामुळे जुन्या झालेल्या या बसेस लवकरात लवकर बदलण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशी करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.